Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम

Siddharth Kaul Retirement: भारतीय संघातील स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे.
Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम
team india
Published On

Siddharth Kaul Retirement News: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली कर्णधार असताना सिद्धार्थ कौलला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

सिद्धार्थला भारतीय संघाकडून फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१९ मध्ये तो शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता.

त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल २०२५ स्पर्धेत कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धार्थ कौलची निवृत्तीची घोषणा

सिद्धार्थ कौल तिनही फॉरमॅटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला २०१८ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणानंतर त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. तर ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला ४ गडी बाद करण्यात यश आले.

Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम
Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

मात्र कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आलं. एकदा संघाबाहेर झाल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळालीच नाही. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला छाप सोडता आली नाही.

Cricketer Retirement: बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाला धक्का! विराटच्या खास खेळाडूचा क्रिकेटला रामराम
Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

विराटच्या नेतृत्वाखाली खेळला होता वर्ल्डकप

विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना सिद्धार्थ कौलने भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतही त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्याचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ५४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ५८ गडी बाद करण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com