
नवी दिल्ली : विराट कोहली Virat Kohli हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मधील सर्वोत्तम बॅट्समनमधील एक बॅट्समन आहे. टीम इंडियाचा कॅप्टन असलेला विराट भारतीय बॅटिंग लाइन अपचा मुख्य आधार मानला जातो. कॅप्टन म्हणून देखील त्याची कामगिरी उत्तम आहे. राइट हॅन्ड बॅट्समन असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात विक्रम केले आहेत.
हे देखील पहा-
आता टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट बॅट्समन असलेल्या कोहलीच्या टेस्ट करियरची सुरुवात मात्र, चांगली झाली नव्हती. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून त्यांने पदार्पण केले होते. कारकिर्दीत पहिल्या टेस्ट सीरिजमधील ३ कसोटी सामन्यात केवळ ७६ रन्स केल्याने त्याला टेस्ट टीममधून काढण्यात आले होते. नंतर स्क्वॉडमध्ये परतल्यानंतर देखील त्याला बराचसा वेळ बेंचवर बसून काढावा लागला होता.
याविषयी वीरेंद्र सेहवागने Virender Sehwag मोठा खुलासा केला आहे. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झालेल्या वीरेंद्र सेहवागने २०१६ मध्ये भारत- इंग्लंड टेस्ट सीरिजच्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना विराट कोहलीच्या टेस्ट करियरच्या Test Career सुरुवातीविषयी एक किस्सा सांगितला होता.
२०११ च्या अखेरीस विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे स्थान मिळवले होते. यानंतर एकदा तो ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर देखील पाठविण्यात आला होता. इतर अनेक भारतीय बॅट्समन प्रमाणे त्यानंही तिथे संघर्ष केला होता.
तिसर्या टेस्टच्या अगोदर मधल्या फळीमध्ये बॅटिंग करणाऱ्या कोहलीला प्लेइंग इलेव्हन मधून काढण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत होते. मात्र, तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनी MS Dhoni आणि व्हाईस कॅप्टन वीरेंद्र सेहवाग Virender Sehwag यांनी कोहलीवर विश्वास दाखवला आणि त्याला टीममध्ये ठेवण्यात आले होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.