Virat Kohli On Rohit Sharma: रोहितच्या कॅप्टनसीवरून विराट कोहलीची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणतो, ' मी त्याला...'

Virat Kohli Statement: विराट कोहलीने रोहित शर्माच्या नेतृत्वावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Virat Kohli On Rohit Sharma: रोहितच्या कॅप्टनसीवरून विराट कोहलीची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणतो, ' मी त्याला...'
virat kohli statement on rohit sharma captaincy amd2000yandex

Virat Kohli Statement On Rohit Sharma Captaincy:

विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने भारतीय क्रिकेटला एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आहे. वनडे, टी -२० आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये दोघंही शानदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ व्या सामन्यात दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तर दुसरीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. दोन्ही खेळाडू आपल्या संघाचे आधारस्तंभ आहेत. मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा एकमेकांचं कौतुक करायला मागचा पुढचा विचार करत नाही. रोहितला भारतीय संघाचं नेतृत्व करताना पाहणं शानदार आहे, असं भारताचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे. (Cricket news in marathi)

Virat Kohli On Rohit Sharma: रोहितच्या कॅप्टनसीवरून विराट कोहलीची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणतो, ' मी त्याला...'
IPl 2024: युजवेंद्र चहलने रचला इतिहास; मोडला शेन वॉर्नचा १३ वर्ष जुना विक्रम

विराट म्हणाला की, ' मी रोहितची एक खेळाडू म्हणून प्रगती होताना पाहिली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत जे काही केलं आहे, ते मी अगदी जवळून पाहिलं आहे. आता तो भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. हा एक शानदार अनुभव आहे.'

विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. सध्या तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. तर विराट कोहली त्याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. हे दोघेही आधी बरेच वर्ष एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी विराट कोहलीकडे सोपवण्यात आली. मग रोहित शर्मा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. आता विराट कोहली रोहितच्या नेतृत्वाखाली खेळतोय.

Virat Kohli On Rohit Sharma: रोहितच्या कॅप्टनसीवरून विराट कोहलीची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणतो, ' मी त्याला...'
RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com