Virat Kohli: कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; विराट कोहली भारतात परतला, काय आहे कारण?

IND vs SA Test series: कसोटी मालिका सुरू होण्याआधी विराट कोहली भारतात परतलाय. वर्ल्डकपनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोधात झालेल्या एकदिवशीय सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. २६ डिसेंबरपासून दोन्ही संघात कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
Virat Kohli
Virat KohliYandex
Published On

Virat Kohli India Vs South Africa Test Series:

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु कसोटी मालिका सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. एकदिवशीय वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली होती. आता होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील संघात या तिघांचा समावेश आहे. परंतु कसोटी मालिका सुरू होण्याआधीच विराट कोहली भारतात परतलाय.

या कारणामुळे कोहली परतला देशात

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार,कसोटी मालिका सुरू होण्याआधी विराट कोहली भारतात परतलाय. यामागे वैद्यकीय इमरजन्सी असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु नेमकं कोणती वैद्यकीय इमरजन्सी आलीय याची माहिती त्यात देण्यात आलेली नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना खेळला जाणार आहे. सरावात भाग घेणार नसल्याचंही विराट कोहलीने संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला सांगितलं होतं. दरम्यान विराट कोहली लवकरच कसोटी सामने खेळण्यासाठी परतेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ऋतुराज गायकवाड हेल्थ अपडेट

एलिजाबोथमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड जखमी झाला होता. यामुळे तो तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात खेळला नाहीये. गायकवड अद्याप त्या जखमीतून सावरू शकलेला नाहीये.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसीध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक).

Virat Kohli
IND vs SA Test Series: मोठी बातमी! भारत- द.आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com