No Ball Rule: विराट खरंच आऊट होता का? काय सांगतो नो बॉलचा नियम? सोप्या शब्दात समजून घ्या

Virat kohli Wicket, Waist High No Ball Rule: विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर नो बॉलवरुन जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान काय सांगतो नियम? जाणून घ्या.
No Ball Rule: विराट खरंच आऊट होता का? काय सांगतो नो बॉलचा नियम? सोप्या शब्दात समजून घ्या
virat kohli no ball wicket controversy know the waist high no ball rule in marathi amd2000twitter

ईडन गार्डन्सचं मैदान, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आमने सामने. या दोन्ही संघांमध्ये सामना असताना वाद झाला नाही हे क्वचितच पाहायला मिळतं. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मात्र यावेळी निमित्त ठरलं विराट कोहलीचा विकेट.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या विराटने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. या सामन्यात तो मोठी खेळी करणार असं वाटत होतं. मात्र हर्षित राणाने फुलटॉस चेंडू टाकून त्याला बाद केलं. या विकेटवरुन विराट अंपायरसोबत वाद घालतानाही दिसून आला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २२२ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२३ धावा करायच्या होत्या.

No Ball Rule: विराट खरंच आऊट होता का? काय सांगतो नो बॉलचा नियम? सोप्या शब्दात समजून घ्या
KKR vs RCB, IPL 2024: पराभवासोबतच फाफ डू प्लेसिसला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

विराटने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानंतर तिसरं षटक टाकण्यासाठी हर्षित राणा गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला आश्चर्याचा धक्का दिला. त्याने फुल टॉस चेंडू टाकला जो विराटच्या बॅटला लागुन हवेत गेला आणि राणाने कुठलीही चूक न करता झेल टिपला. अम्पायरने त्याला बाद घोषित केलं. विराटने DRS ची मागणी केली. DRS मध्येही तो बाद असल्याचं दिसून आलं.

काय सांगतो नियम?

आयपीएल २०२४ स्पर्धेत हॉक आय बॉल ट्र्रॅकिंग सिस्टमचा वापर केला जात आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या कमरेच्या उंचीची मोजणी केली आहे. त्यामुळे गोलंदाज जेव्हा फुल टॉस चेंडू टाकतो त्यावेळी या नवीन तंत्रज्ञानानुसार चेंडू फुल टॉस आहे की नाही हे कळून येतं. फलंदाज कुठे उभा आहे, हे यावेळी महत्वाचं मानलं जात नाही. तर फलंदाज पॉपिंग क्रिझमध्ये असता तर चेंडू कुठे जाऊन लागला असता यावरुन नो बॉल आहे की नाही, याचा अंदाज लावला जातो. जर चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या उंचीपेक्षा अधिक असेल तर तो नो चेंडू घोषित केला जातो.

No Ball Rule: विराट खरंच आऊट होता का? काय सांगतो नो बॉलचा नियम? सोप्या शब्दात समजून घ्या
Virat Kohli Wicket: विराटच्या विकेटवरुन गंभीर थेट अंपायरशी भिडला? KKR - RCB सामन्यातील तो Video व्हायरल

विराट कोहली बाद होता का?

विराट कोहली हा शॉट खेळण्यासाठी पुढे गेला होता. ज्यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावेळी विराट कोहली क्रिझच्या बाहेर होता. अंपायरने सांगितलं की, जर विराट क्रिझमध्ये असता तर चेंडू त्याच्या कमरेच्या उंचीपेक्षा खाली राहिला असता. विराटच्या कमरेची उंची १.०४ मीटर इतकी आहे. त्याने जर क्रिझमध्ये राहुन हा शॉट खेळला असता तर चेंडूची उंची ०.९२ इतकी राहिली असती. त्यामुळे अम्पायरने त्याला बाद घोषित केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com