Virat Kohli Records: विराट कोहलीचा विक्रमांचा धडाका सुरुच, टी-20 इंटरनॅशनलमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सेमिफायनल सामन्यात इतिहास रचला आहे.
Virat Kohli
Virat Kohlisaam tv
Published On

T20 World Cup : विक्रमवीर विराट कोहलीच्या (Virat Kohli) रेकॉर्ड लिस्टमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सेमिफायनल सामन्यात इतिहास रचला आहे. विराटने टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. चार हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट एकमेव खेळाडू आहे. (Cricket News)

विराट आज मैदानात उतरला होता त्यावेळी त्याच्या 3958 धावा होत्या. त्याला चार हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी 42 धावांची आवश्यकता होती. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.

Virat Kohli
Ind Vs Eng : सेमिफायनलआधी रोहित शर्माची भीतीनं उडाली होती झोप, टॉसनंतर स्वतःच सांगितलं कारण

विराटची टी20 कारकिर्द

कोहलीने आतापर्यंत टी 20 मध्ये 114 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 52.77 च्या सरासरीने 3958 धावा केल्या आहेत. यात कोहलीने एक शतक आणि 36 अर्धशतक झळकावले आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू होता. त्यावेळी त्याने अवघ्या 87 सामन्यांमध्ये 81 डावांमध्ये 3000 धावा केल्या होत्या.

कोहलीनंतर या यादीत रोहित शर्माचं नाव आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी रोहितने 147 सामने खेळले आणि 31.36 च्या सरासरीने 3826 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमआणि त्यानंतर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांचा क्रमांक लागतो.

T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. विराट कोहली (भारत) - 114 सामने - 3958 धावा

  2. रोहित शर्मा (भारत) - 147 सामने - 3826 धावा

  3. मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) - 122 सामने - 3531 धावा

  4. बाबर आझम (पाकिस्तान) - 98 सामने - 3323 धावा

  5. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) - 121 सामने - 3181 धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com