Virat Kohali Record: विराट कोहलीने रचला इतिहास; IPLमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Virat Kohli Record In IPL: विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यंदाच्या मोसमात विराटने १५ सामने खेळलेत. या काळात विराट कोहलीने १५ डावात ६१.७५ च्या सरासरीने आणि १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने ७४१ धावा केल्या
Virat Kohali Record: विराट कोहलीने रचला इतिहास; IPLमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Published On

आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जातोय. दरम्यान यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा फलंदाजा विराट कोहलीने केल्यात. यंदाची 'ऑरेंज कॅप' विराट कोहलीच्या डोक्यावर सजणार असल्याचं निश्चित झाले आहे.

विराट कोहली हा आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. १७ व्या मोसमात विराट कोहली १५ सामने खेळले. या काळात विराट कोहलीने १५ डावात ६१. ७५ च्या सरासरीने आणि १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने ७४१ धावा केल्या. आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीने ५ अर्धशतक आणि १ शतक झळकावलेत. या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद ११३ धावा असून त्याने या धावसंख्येसह इतिहास रचला. आयपीएलच्या २ हंगामात 'ऑरेंज कॅप' जिंकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. यापूर्वी आयपीएल २०१६ मध्येही विराट कोहलीने 'ऑरेंज कॅप' पटकावली होती.

IPL २०१६ मध्ये विराट कोहलीने बॅटमधून आग ओकत सर्वाधिक धावा केल्या होत्या. किंग कोहलीने ९व्या हंगामात १६ सामने खेळले. या काळात कोहलीने १६ डावात ८१.०८ च्या सरासरीने आणि १५२.०३ च्या स्ट्राईक रेटने ९७३ धावा केल्या. आयपीएलमध्ये कोहलीने ७ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली होती. त्या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या ११३ धावा होती. दरम्यान आयपीएलमध्ये सर्वाधिक ऑरेंज कॅप्स जिंकण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने ३ मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅप विजेत्यांची यादी

IPL २००८: शॉन मार्श (६१६)

IPL २००९: मैथ्यू हेडन (५७२)

IPL २०१०: सचिन तेंदुलकर (६१८)

IPL २०११: क्रिस गेल (६०८)

IPL २०१२: क्रिस गेल (७३३)

IPL २०१३: माइकल हसी (७३३)

IPL २०१४: रॉबिन उथप्पा (६६०)

IPL २०१५: डेविड वॉर्नर (५६२)

IPL २०१६: विराट कोहली (९७३)

IPL २०१७: डेविड वॉर्नर (६४१)

IPL २०१८: केन विलियमसन (७३५)

IPL २०१९: डेविड वॉर्नर (६९२)

IPL २०२०: केएल राहुल (६७०)

IPL २०२१: रुतुराज गायकवाड़ (६३५)

IPL २०२२: जोस बटलर (८६३)

IPL २०२३: शुभमन गिल (८९०)

IPL २०२४: विराट कोहली (७४

Virat Kohali Record: विराट कोहलीने रचला इतिहास; IPLमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
T20 World Cup 2024: IPL ला रामराम करणाऱ्या दिनेश कार्तिकवर ICC ने सोपवली मोठी जबाबदारी

IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्यात

विराट कोहली : ७४१ धावा

रुतुराज गायकवाड : ५८३ धावा

रियान पराग : ५७३ धावा

ट्रॅव्हिस हेड: 567 धावा

संजू सॅमसन : ५३१ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com