Vamika-Akaay Rakshabandan: वामिका अन् अकायने पहिल्यांदाच साजरं केलं रक्षाबंधन; क्यूट Photo व्हायरल

Virat Kohli Kids: वामिका आणि अकाय कोहली यांनी पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरं केलं आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Vamika-Akaay Rakshabandan: वामिका अन् अकायने पहिल्यांदाच साजरं केलं रक्षाबंधन; क्यूट Photo व्हायरल
virat kohli anushka sharmatwitter
Published On

भारतात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संघातील स्टार खेळाडूंनी देखील रक्षाबंधन साजरं केलं. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान कोहली कुटुंबानेही पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरं केलं. अकाय आणि वामिकाने रक्षाबंधन साजरा केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Vamika-Akaay Rakshabandan: वामिका अन् अकायने पहिल्यांदाच साजरं केलं रक्षाबंधन; क्यूट Photo व्हायरल
Virat Kohli: किंग कोहलीचा दरारा..कालपण आणि आजपण! विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या आयुष्यात १५ फेब्रुवारी रोजी अकायचं आगमन झालं होतं. अनुष्काने लंडनमध्ये असताना अकायला जन्म दिला होता. विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती.

अकाय आणि वामिका यांनी पहिल्यांदाच रक्षाबंधना साजरा केलं. हा फोटो अनुष्का शर्माने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघातील खेळाडूंना १९ सप्टेंबरपर्यंत ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. हे दोघेही आपल्या कुटुंबासह मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. भारतात असताना विराट आणि अनुष्का कधीच सार्वजानिक ठिकाणी एकत्र दिसून आले नव्हते. मात्र लंडनमध्ये ते वामिका आणि अकायसह सार्वजानिक ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत.

Vamika-Akaay Rakshabandan: वामिका अन् अकायने पहिल्यांदाच साजरं केलं रक्षाबंधन; क्यूट Photo व्हायरल
Virat Kohli Record: कसोटीत विराटच किंग! पहिल्याच कसोटीत डॉन ब्रॅडमनचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी वामिका आणि अकायला सोशल मीडियापासून दुर ठेवलं आहे. या दोघांनी वामिका आणि अकायचा एकही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेला नाही.

मात्र त्यांचा एक व्हिडिओ सोशल माीडियावर व्हायरल होतोय, ज्यात हे दोघेही आपल्या कुटुंबासह असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ विराट कोहलीच्या एका फॅनने शेअर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com