विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावे आतापर्यंत अनेक मोठमोठे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. यापैकी काही असे रेकॉर्ड आहेत जे मोडले जाणं जरा कठीणच आहे.
दरम्यान १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहलीला डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका पार पडली. या दौऱ्यावर विराट कोहली वनडे मालिका खेळताना दिसून आला होता. ही मालिका झाल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतला आहे.
आता १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहली ॲक्शनमध्ये दिसेल. दरम्यान या मालिकेत एक शतक झळकावताच तो सर्वाधिक शतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये डॉन ब्रॅडमनला मागे सोडणार आहे.
विराट कोहलीच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११३ सामन्यांमध्ये २९ शतकं झळकावली आहेत. तर डॉन ब्रॅडमन ने देखील आपल्या कारकिर्दीत २९ शतकं झळकावली होती. १ शतक झळकावत तो डॉन ब्रॅडमनला मागे सोडेल. यासह ३० शतकं झळकावत तो मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या रेकॉर्डची बरोबरी करेल.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या ६ सामन्यांमध्ये विराट कोहलीने ४३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक देखील झळकावले आहेत. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.