Viral Video: क्रिकेटच्या मैदानात फुलऑन राडा; आधी 'हमरी तुमरी नंतर धक्काबुक्की, एकाने हेल्मेट खेचलं, दुसऱ्यानं बॅट...

Cricket Fights Video: क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज आणि फलंदाजामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
Viral Video
Cricket Fights Videosaam tv
Published On

क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांना टशन देत असतात. चिडवतात. पण कधीकधी खेळाडू एकमेकांना भिडत असतात. क्रिकेट हा जेंटलमन्सचा गेम म्हणजेच सभ्य माणसांचा खेळ मानला जातो. पण सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे हा सभ्य लोकांचा खेळ राहिला नसल्याचं दिसत आहे. कारण भरमैदानात गोलंदाज आणि फलंदाजामध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय. दोघांमध्ये हाणामारी झालीय.

हा व्हिडिओ कुठला आहे?

दोन इर्मजिंग संघांमध्ये सध्या सामने सुरू आहेत. नव्या दमाचे उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेतून शोधले जातात. यातून चांगले खेळाडू वरिष्ठ पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करतात. अशा एका सामन्यात दक्षिण आफ्रिका इमर्जिंग आणि बांगलदेश इमर्जिंग हे दोन संघ भिडलेत. संघ ऐन रंगात आले असताना या दोन्ही संघाचे खेळाडू भिडले.

Viral Video
IPL PBKS vs RCB: क्वॉलिफायर १ चा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? कोणाचा मार्ग होईल खडत्तर

बांगलादेशचा फलंदाज रिपॉन मोंडल आणि आफ्रिकेचा गोलंदाज शेपो नटुली यांच्यात जोरदार राडा झाला. दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. रिपॉनने फलंदाजी करताना षटकार मारला. त्यानंतर तो नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या दुसऱ्या फलंदाजाकडे जात असताना गोलंदाज शेपो नटुली याने त्याच्यासोबत हमरीतुमरी केली. नंतर त्याच्या जवळ येत त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर फलंदाजाने आपल्या हातातील बॅट त्याच्यावर उगारली.

एकमेकांनी खुन्नस दिल्यानंतर हे प्रकरण चिघळलं. दोघे एकमेकांवर चाल करून गेले. इतर खेळाडू आणि पंच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही राग अनावर झाला. त्यामुळे आधी धक्काबुक्की सुरु झाली. त्यानंतर लगेच थोडीशी हाणामारीही झाली.

ऋषभचं धमाकेदार सेलिब्रेशन, Video Viral

आयपीएलच्या 18 हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने शानदार शतक ठोकलं. शतकानंतर त्याने केलेलं सेलिब्रेशन अनेकांना थक्क करणारं होतं. मंगळवारी झालेल्या सामन्यात ऋषभ पंतनं आयपीएल कारकिर्दीतील दुसरे ठोकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com