Vinod Kambli Net Worth : एकेकाळचा क्रिकेटच्या मैदानावरचा 'नवकोट नारायण' असाणाऱ्या विनोद कांबळीला आता मुंबईत (Mumbai) गुजराण करणेही कठीण झालेय. काही दिवसांपूर्वी विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला अन् सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात आली. विनोद कांबळीला (Vinod Kambli Net Worth) चालताही येत नसल्याचे त्या व्हिडीओत दिसत होतं. विनोद कांबळी याच्याकडे सध्या काहीच पैसे नसल्याचे समोर आलेय. बीसीसीआयकडून (BCCI) मिळणाऱ्या पेन्शनवर विनोद कांबळी (Vinod Kambli Net Worth) सध्या गुजराण करत असल्याचे समोर आलेय. विनोद कांबळीला बीसीसीआयकडून वर्षाला चार लाख रुपये मिळतात. त्याला मासिक ३० हजार रुपये मिळत असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आलेय.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतोच, त्यातूनच माणूस शिकतो अन् उभा राहतो. पण विनोद कांबळीला आपल्या चुकातून शिकताच आलं नसल्याचं दिसतेय. विनोद कांबळी अनेकदा वादात अडकला, पैशांची चणचण भासली. एकेकाळी कोट्यवधी कमवणारा कांबळी आज फक्त महिन्याला तीस हजार रुपयांवर जगतोय. विनोद कांबळीने ज्यावेळी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस मानले जात होतं. पण विनोद कांबळीला स्टारडम जपता आले नाही. पण आज त्याला चालताही येत नाही. चालण्यासाठी विनोद कांबळीला दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रीडा चाहते हैराण झाले.
विनोद कांबळीचा जन्म १८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. क्रिकेट खेळताना सुरुवातीला सचिन तेंडुलकरपेक्षाही त्याला सरस मानले जायचे. पण एक काळ असा आला की त्याच्याकडे पैसेही राहिले नाहीत.
भारतासाठी मॅच विनिंग खेळ्या करणाऱ्या विनोद कांबळी कोट्यवधींची कमाई करायचा. विनोद कांबळीची तेव्हाची नेटवर्थ जवळपास एक ते १.५ मिलियन डॉलर इतकी होती.
२०२२ मध्ये विनोद कांबळीची अवस्था अतिशय खराब झाली. त्याची नेटवर्थ फक्त चार लाख रुपये इतकीच राहिली. कांबळीची अवस्था सध्या इतकी भयंकर झाली की बीसीसीआयकडून मिळणाऱ्या मासिक कमाईवरच तो जगतोय. विनोद कांबळीला बीसीसीआयकडून महिन्याला तीस हजार रुपयांची पेन्शन मिळत आहे. यावरच त्याला आपलं घरं चालवावे लागत आहे.
एकेकाळी सुपरस्टार असणाऱ्या विनोद कांबळीची आज परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कारण, क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर काहीच केले नाही. कांबळीकडे कमाईचे अनेक पर्याय होते. सामन्यांमध्ये समालोचन करणे, जाहिरातींमध्ये काम करणे, यामधून चांगली कमाई करता येते. सध्या अनेक माजी खेळाडू जाहीरात, समालोचन, कोचिंगमधून कोट्यवधींची कमाई करत आहेत. विनोद कांबळीला हेच जमले नाही. त्यामुळेच विनोद कांबळी आज एक एक रुपयांसाठी संघर्ष करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.