Venkatesh Iyer Record: वेंकटेश अय्यरच्या ९ षटकारांनी मोडले सर्वच रेकॉर्ड! थेट युवीच्या विक्रमाची केली बरोबरी

Venkatesh Iyer: त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Venkatesh iyer
Venkatesh iyertwitter
Published On

MI VS KKR IPL 2023: मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर रविवारी एक रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात Kolkata Knight RIders आणि Mumbai Indians हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वानखेडेच्या निळ्या वादळात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एकमेव तारा चमकला तो म्हणजे वेंकटेश अय्यर.

अय्यरने या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत १०४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Venkatesh iyer
Sanju Samson Record: IPL स्पर्धेत सिक्सर किंग ठरतोय Sanju Samson; 6 षटकार मारताच झाली मोठ्या विक्रमाची नोंद!

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. मात्र गेली १५ वर्षे केवळ ब्रँडन मॅक्क्युलमला तिहेरी धावसंख्येचा पल्ला गाठता आला होता. इतर कुठल्याही फलंदाजाने शतक पूर्ण केले नव्हते.

मात्र १६ व्या हंगामात हा वनवास संपवत Venkatesh Iyer ने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी दुसरे तर वैयक्तिक पहिले शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

वेंकटेश अय्यर हा आयपीएल स्पर्धेतील एकाच इंनिगमध्ये ९ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा १२ वा भारतीय फंलदाज ठरला आहे. एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा मुरली विजयच्या नावे आहे.

त्याने एकाच डावात ११ षटकार मारले होते. तर संजू सॅमसन आणि श्रेएस अय्यर दुसऱ्या स्थानी आहेत. दोघांनी १०-१० षटकार मारले आहेत. (Latest sports updates)

Venkatesh iyer
Fights In IPL: मुबंईच्या मैदानावर दिल्लीकरांचा तुफान राडा! सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

हे ९ फलंदाज आहेत यादीत..

व्यंकटेश अय्यर, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड

गेल्या हंगामात वेंकटेश अय्यरला हवी तशी कामगीरी करता आली नव्हती. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला रिटेन केले होते. मात्र त्याने या हंगामात १२ सामन्यांमध्ये १६.५५ च्या सरासरीने १८२ धावा केल्या होत्या.

Venkatesh iyer
Sachin Tendulkar IPL 2023: मुलाचं पदार्पण होताच क्रिकेटचा देव भावुक! खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

तसेच या सामान्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथमी फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली.

तर आंद्रे रसलने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८५ धावा केल्या होत्या.

तर या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने ५८ आणि सूर्यकुमार यादवने ४३ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com