6,6,6,6,6,6,6,6,6,6...वैभव सूर्यवंशीची जोरदार फलंदाजी, ४२ चेंडूत कुटल्या १४४ धावा

vaibhav suryavanshi batting : यूएईमधील सामन्यात वैभव सूर्यवंशीने जोरदार फलंदाजी केरली. वैभव सूर्यवंशीने ४२ चेंडूत १४४ धावा कुटल्या.
vaibhav suryavanshi News
vaibhav suryavanshiSaam tv
Published On
Summary

वैभव सूर्यवंशीने ४२ चेंडूत १४४ धावा करून उडवला गोलंदाजांचा धुव्वा

वैभवने ३२ चेंडूत शतक पूर्ण केलं शतक

नमन धीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी रचली १६३ धावांची भागीदारी

एसीसी मेन्स आशिया कपच्या रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारतची ए टीमचा पहिला सामना यूएई संघासोबत झाला. दोहाच्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताच्या ए - टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यातील वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीची जोरदार चर्चा होत आहे.

भारताचा कर्णधार जितेश शर्माच्या निर्णयावर टीमने चांगली कामगिरी केली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. १४ वर्षांच्या वैभवने ३२ चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने डावात १० चौकार आणि ९ षटकार लगावले. वैभवने आक्रमक फलंदाजी करताना ४२ चेंडूत १४४ धावा केल्या. त्याने डावात १५ षटकार आणि ११ चौकार लगावले.

vaibhav suryavanshi News
Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

वैभव सूर्यवंशीने नमन धीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत १६३ धावांची भागीदारी रचली. नमनने २२ चेंडूत ३४ धावा कुटल्या. त्यात तीन चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात वैभवने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वैभवला मुहम्मद फराजुद्दीनने झेलबाद केलं. वैभवचा झेल अहमद तारिकने घेतला.

vaibhav suryavanshi News
Narendra Modi : बिहारमध्ये कोणता फॉर्म्युला यशस्वी ठरला? PM नरेंद्र मोदींनी सगळंच सांगितलं

सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय खेळाडू कोण?

उर्विल पटेल - २८ चेंडू , गुजरात विरुद्ध त्रिपुरा, इंदूर, २०२४

अभिषेक शर्मा - २९ चेंडू, पंजाब विरुद्ध मेघालय, सौराष्ट्र, २०२४

ऋशभ पंत - ३२ चेंडू, दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश, दिल्ली, २०१८

वैभव सूर्यवंशी - ३२ चेंडू, भारत-ए टीम विरुद्ध यूएई, दोहा, २०२५

vaibhav suryavanshi News
Narendra Modi : बिहारमध्ये कोणता फॉर्म्युला यशस्वी ठरला? PM नरेंद्र मोदींनी सगळंच सांगितलं

भारत-ए प्लेइंग इलेवन : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहाल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (विकेटकीपर/कर्णधार), रमनदीप सिंह, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंह आणि सुयश शर्मा.

यूएई प्लेइंग इलेवन : अलीशान शराफू (कर्णधार), सैयद हैदर (विकेटकीपर), सोहैब खान, मयंक राजेश कुमार, हर्षित कौशिक, अयान अफजल खान, अहमद तारिक, मुहम्मद अरफान, मुहम्मद फराजुद्दीन, मुहम्मद रोहिद खान, मुहम्मद जवादुल्लाह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com