Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्र, भारत काय भूमिका घेणार? क्रीडामंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Mansukh Mandaviya On Vinesh Phogat Disqualification: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरली आहे. दरम्यान अपात्रतेच्या मुद्द्यावर क्रीडामंत्री काय म्हणाले?
Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्रतेवर भारत काय भूमिका घेणार? केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
vinesh phogattwitter
Published On

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनल सामन्याआधी अपात्र ठरली आहे. विनेश फोगाटने ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिचा फायनलचा सामना आज यूएसएच्या कुस्तीपटूसोबत होणार होता. मात्र फायनलच्या सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

जगातील नंबर १ खेळाडूला पराभूत केल्यानंतर भारताचं एक पदक निश्चित झालं होतं. मात्र फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ती १०० ग्रॅममुळे बाहेर पडली आहे. दरम्यान अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना मनसुख मांडविया म्हणाले की,' आज तिचं वजन ५० किलो १०० ग्रॅम आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तिव्र निषेध नोंदवला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षा पी.टी. उषा या सध्या पॅरिसमध्ये आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा करुन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सरकारने तिला वैयक्तिक कर्मचारीसह सर्व सुविधाही उपलब्ध करुन दिल्या होत्या. '

Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्रतेवर भारत काय भूमिका घेणार? केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11

विनेश फोगाटचे सासऱ्यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे सासरे म्हणाले की, ' विनेशविरुद्ध कट रचला जातोय. केसांमुळेही १० ग्रॅम वजन वाढतं. यात सरकारसह बृतभूषण सिंग यांचाही हात असल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला आहे. यापूर्वी विनेशने अनेकदा सांगितलं होतं की, माझ्याविरुद्ध कट रचला जातोय. असंही तिच्या सासऱ्यांनी सांगितलं.

Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्रतेवर भारत काय भूमिका घेणार? केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
Paris Olympics 2024: फक्त १०० ग्रॅम वजन जास्त, विनेश फोगाटला फायनलआधी अपात्र ठरवलं, ऑलिम्पिकचा नियम काय सांगतो....

विनेश फोगाट ही ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. तिने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना पराभूत केलं. तिने प्री क्वार्टर फायनमध्ये युवी सुसाकीचा ३-२ ने पराभव केला. त्यानंतर युक्रेनच्या ओक्सानाला ७-५ ने धूळ चारली. सेमिफायनलमध्ये तिने गुझमन लोपेझचा ५-० ने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com