WU19 T20 WC: टीम इंडियानं न्यूझीलंडला लोळवले, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक

WU19 T20 WC, Team India : भारतीय महिला अंडर १९ क्रिकेट संघानं जबरदस्त कामगिरी करत टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली.
WU19 T20 WC, Team India
WU19 T20 WC, Team IndiaICC/Twitter
Published On

WU19 T20 WC, Team India : भारतीय महिला अंडर १९ क्रिकेट संघानं जबरदस्त कामगिरी करत टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी टीम इंडियाच्या पार्शवी चोपडानं घातक गोलंदाजी केली. त्यानंतर श्वेता सेहरावतनं धुवांधार फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजी करताना ९ विकेटच्या मोबदल्यात अवघ्या १०७ धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियानं हे माफक लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांतच पार केलं. (Cricket News)

WU19 T20 WC, Team India
Surya Kumar Yadav: सूर्यकुमार जगात भारी! पटकावला सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार

या विजयासह टीम इंडियानं (Team India) अंडर १९ टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली. अंतिम सामन्यात भारताची गाठ आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमिफायनलमधील विजेत्या संघासमवेत पडेल. (Sports News In Marathi)

न्यूझीलंडविरुद्ध अंडर १९ टी २० वर्ल्डकप (U19 T20 World Cup) सेमिफायनलमध्ये भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाला अवघ्या १०७ धावांवर गारद केलं.

चर्जिया प्लीमरच्या ३५ धावा आणि एजाबेल गेजच्या २६ धावांच्या जोरावर न्यूझीलंडला ही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. भारताकडून पार्शवी चोपडा हिने ४ षटकांत २० धावांच्या बदल्यात ३ गडी बाद केले.

WU19 T20 WC, Team India
IND Vs NZ T20 Series: न्यूझीलंडला T20 मध्ये धूळ चारण्यास हार्दिक सेना सज्ज; 'हे' पाच खेळाडू करणार मोठा धमाका

श्वेताची तुफानी खेळी

भारतीय सलामीवीर श्वेता सेहरावत हिने आणखी एक धमाकेदार खेळी केली. तिच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडविरुद्ध सेमिफायनलमध्ये कर्णधार शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर श्वेतानं भारताचा डाव सावरला. तिनं ४५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीनं ६१ धावा कुटल्या.

टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ग्रुप डीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंड यांच्यासह भारतीय संघ होता. या ग्रुपमध्ये सर्व सामने जिंकून भारतानं सुपर सिक्स फेरीत स्थान मिळवलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतानं श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवत सेमिफायनलमध्ये धडक दिली. सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून भारतानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com