Nitish Reddy father : पायावर डोकं ठेवलं आणि...; सुनील गावस्करांना पाहताच नितीश रेड्डीचे वडील भावूक

Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feet: नितीश रेड्डी याने कठीण परिस्थितीत टीम इंडियाचा डाव सांभाळला आणि 114 रन्सही केले. त्याचे वडील मुत्याला रेड्डी यांचा स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feet
Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feetsaam tv
Published On

मेलबर्न टेस्टमध्ये सध्या नाव गाजतंय ते नितीश रेड्डीचं. 21 वर्षीय नितीश कुमार रेड्डी मेलबर्न टेस्टमध्ये शतक झळकावून भारतीय क्रिकेटचा स्टार बनला आहे. क्रिकेट एक्सपर्टपासून ते चाहत्यांपर्यंत सगळेच त्याची चर्चा करतायत.

गावस्करांच्या पाया पडले मुत्याला

मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यादरम्यान नितीशच्या कुटुंबीयांनी गावस्कर यांची भेट घेतली. यादरम्यान नितीशचे वडील मुत्याला यांनी महान लिटील मास्टर सुनील गावस्कर पायाला स्पर्श केला. या भेटीनंतर गावस्कर भावूक झाले. मुत्याला यांनी गावस्करांच्या पायांना स्पर्श केला. नितीश रेड्डीला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पुढे नेल्याबद्दल गावस्करांचे आभार मानले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. गावस्कर म्हणाले की, मुत्याला यांच्या बलिदानामुळे भारताला नितीश रेड्डी नावाचा हिरा मिळाला आहे.

Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feet
Video: विराटचा बदला बुमराहनं घेतला, कॉन्स्टासला दाखवला आरसा, बूम बूमचे स्पेशल सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

सुनील गावस्कर काय म्हणाले?

सुनील गावस्कर म्हणाले की, त्यांनी किती त्याग केला आहे हे मला माहीतीये . त्याने खूप संघर्ष केला आहे. तुमच्यामुळे माझे डोळे पाणावले आहेत. तुमच्यामुळे भारताला हिरा मिळाला आहे, भारतीय क्रिकेटला एक हिरा मिळाला आहे.

Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feet
IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून हायव्होल्टेज ड्रामा; भर मैदानात पॅट कमिन्स थेट अंपायरशी भिडला, पाहा नेमकं काय घडलं?

एमसीजीच्या बॅकरूममध्ये उपस्थित लोकांनी हा भावनिक क्षण टिपला. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणनेही टेस्ट सामन्यादरम्यान नितीशच्या वडिलांची भेट घेतली.

नितीश रेड्डीच्या वडिलांचा संघर्ष

नितीशचे वडील मुताल्या रेड्डी यांनी आपल्या मुलाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप त्याग केला. नितीश यांच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी मुताल्या यांनी २०१६ मध्ये हिंदुस्थान झिंकमधील नोकरी सोडली होती. मात्र हा सोपा मार्ग नव्हता.

Nitish Reddy father touches Sunil Gavaskar feet
Jasprit Bumrah: वाढदिवस ट्रेविस हेडचा, सेलिब्रेशन मात्र बुमराहचं, बर्थडे बॉयची विकेट घेत जस्सीने रचला इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com