ISPL 2025: 50-50 ओव्हरने फिरवला सामना! माझी मुंबई ठरली ISPL चॅम्पियन

mumbai 50-50 ओव्हरने सामना फिरवला आहे. ISPL चॅम्पियनस स्पर्धेत माझी मुंबई अशा विजेतया विजयाचं संघ आहे.
ISPL 2025 update :
ISPL 2025 update :Saam tv
Published On

आयएसपीएल २०२५ स्पर्धेचा थरार ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पार पडला. स्पर्धेतील फायनलमध्ये माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दुसऱ्या हंगामाची ट्रॉफी उंचावण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली.

ISPL 2025 update :
Cricket Fight : श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तुफान राडा; 2 संघामध्ये तुंबळ हाणामारी,VIDEO

श्रीनगर के वीर संघाने प्रथम फलंदाजी १० षटक अखेर ५ गडी बाद १२० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने शानदार कामगिरी करत ३ गडी राखून विजय मिळवला.

श्रीनगर के वीर संघाने उभारला धावांचा डोंगर..

श्रीनगर के वीर संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने १० षटक अखेर ५ गडी बाद १२० धावा केल्या.

ISPL 2025 update :
Cricketer Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

या संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज आकाश तरेकरने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर सागर अलीने ४० धावांची खेळी केली. माझी मुंबई संघाला हा सामना जिंकण्यासाठी १० षटकात १२१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाकडून रजत मुंडेने २३ धावांची खेळी केली.

ISPL 2025 update :
ICC ODI Cricketer of the Year: महाराष्ट्राची लेक जगात भारी! स्मृती मंधाना ICC क्रिकेटर ऑफ द इअर

त्यानंतर महेंद्र चंदनने १३ धावा केल्या. शेवटी बिरेंद्र राम आणि विजय पावलेने तुफान फटकेबाजी केली. ५०–५० षटकात मुंबईने सामना आपल्या दिशेने खेचून आणला आणि हा सामना आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com