IPL 2025 Mega Auction: पुणे कसोटीतील हिरो IPL लिलावात खाणार भाव! 1,2 नव्हे तर 3 संघांकडून मोठी ऑफर

Washington Sundar: येत्या नोव्हेंबर महिन्यात आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव होणार आहे. या लिलावात स्टार खेळाडूवर मोठी बोली लागू शकते.
IPL 2025 Mega Auction: पुणे कसोटीतील हिरो IPL लिलावात खाणार भाव! 1,2 नव्हे तर 3 संघांकडून मोठी ऑफर
team indiatwitter
Published On

Washington Sundar, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील मेगा ऑक्शन येत्या नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे. या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या संघांची यादी जाहीर करावी लागणार आहे. यादरम्यान काही स्टार खेळाडू आपला संघ सोडून ऑक्शनमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. दरम्यान पुणे कसोटीतील हिरो वॉशिंग्टन सुंदरबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

वॉशिंग्टन सुंदर गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसून आला होता. मात्र मेगा ऑक्शनपूर्वी त्याला हैदराबादचा संघ रिटेन करणार असल्याची कुठलीच बातमी समोर आलेली नाही. त्यामुळे तो ऑक्शनमध्ये येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे कसोटीत शानदार गोलंदाजी

रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. संघात स्थान देताच, त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याचीही संधी दिली गेली. या संधीचा फायदा घेत त्याने दोन्ही डावात मिळून १३ गडी बाद केले. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र सनरायझर्स हैदराबादने त्याला रिटेन करण्यात रस दाखवलेला नाही.

IPL 2025 Mega Auction: पुणे कसोटीतील हिरो IPL लिलावात खाणार भाव! 1,2 नव्हे तर 3 संघांकडून मोठी ऑफर
IND vs NZ 3rd Test: मुंबईत धावांचा पाऊस पडणार की विकेट्सची रांग लागणार? कशी असेल खेळपट्टी?

एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' सुंदर मेगा ऑक्शनमध्ये जाण्यास इच्छुक आहे. कमीत कमी ३ संघांनी चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघांनी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला आहे.'

IPL 2025 Mega Auction: पुणे कसोटीतील हिरो IPL लिलावात खाणार भाव! 1,2 नव्हे तर 3 संघांकडून मोठी ऑफर
IND vs NZ, 2nd Test: 4331 दिवसांनंतर भारताचा मायदेशात पराभव! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

सुंदरच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १४७ सामने खेळले आहेत. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने ११२ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने १२६३ धावा केल्या आहेत.आयपीएल स्पर्धेत त्याने ६० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३७ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना ३७८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com