
प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना वरळी डोम याठिकाणी तीन दिवस रंगणार आहे. ७, ८, ९ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसात हा सामना रंगणार आहे. अंतिम स्पर्धेत राज्यभरातील १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत. थरांवर थराचा रोमहर्षक खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रो गोविंदा सीझन ३ चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू ख्रिस गेल असणार आहे. ख्रिस गेल यांच्या उपस्थितीमुळे प्रो गोविंदा सीझन ३ आणखी ग्लोबल होईल. तसेच खेळाडूंना प्रेरणा मिळेल, हा खेळ केवळ आपल्या देशा पुरता मर्यादित न राहता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचेल.
प्रो गोविंदा सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाणार आहेत.
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले की, आजची स्पर्धात्मक बोली ही प्रो गोविंदा लीगच्या मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. एकेकाळी केवळ उत्सवाचा भाग असलेली ही परंपरा आता एका व्यावसायिक साहसी खेळात बदलली आहे, ज्यामध्ये खेळाडूंकडे प्रचंड ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य असणे आवश्यक आहे.
जागतिक क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने लीगला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित एका विश्वासार्ह क्रीडा व्यासपीठाचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. तरुण गोविंदांना करिअरची संधी देऊन महाराष्ट्राचा हा वारसा देश आणि जगात पोहोचवणे, हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे, असंही सरनाईक म्हणालेत.
नागपूर निजान्स
अलिबाग नाईट्स
शूर मुंबईकर
ठाणे टायगर्स
मिरा भाईदर लायन्स
नाशिक रेन्जर्स
दिल्ली इगल्स
सुरत टायटन्स
जयपूर किंग्स
बंगळुरू ब्लेझर्स
हैदराबाद डायनामोज
गोवा सर्फर्स
वाराणसी महादेव असेंडर्स
लखनऊ पँथर्स
नवी मुंबई स्ट्रायकर्स
मुंबई फाल्कन्स योद्धा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.