ICC Women's T20 WC:WPLची सर्वात महागडी खेळाडू टीम इंडियासाठी करणार कमबॅक! WI विरुद्धच्या सामन्यात अशी असेल प्लेइंग 11

या स्पर्धेतील दुसरा सामना आज भारत विरुद्व वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे
Team India
Team India Saam Tv

ICC Women's T20 WC:आयसीसी विमेन्स टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना आज भारत विरुद्व वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात उतरण्यापूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे.

कारण भारतीय संघाने (Team India) आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला होता. तर वेस्टइंडीज संघ या सामन्यात पुनरागमन करण्याच्या विचारात असणार आहे. कारण वेस्टइंडीज संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest Sports Updates)

सध्या भारतीय संघातील खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. आता भारतीय संघ आणखी मजबूत होऊन मैदानात उतरणार आहे. कारण पहिल्या सामन्यातुन दुखापतीमुळे संघाबाहेर झालेली स्मृती मंधाना या सामन्यात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे ती संघात येताच, यस्तिका भाटियाचा पत्ता कट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठलाही बदल केला जाण्याची शक्यता खूप कमी आहे.

Team India
IND vs AUS : दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखीच वाढणार!

WPL च्या लिलावात ठरली सर्वात महागडी खेळाडू..

नुकताच पार पडलेल्या विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावात स्मृती मंधाना ही सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. या लिलावात पहिली बोली तिच्यावरच लागली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३.४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. सर्व संघांनी तिला आपल्या संघात स्थान देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शेवटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बाजी मारली.

Team India
INDW VS PAKW: जिंकलो रे! जेमिमाच्या रुद्रावतारासमोर पाक गोलंदाज सरेंडर; भारताचा दिमाखदार विजय

भारत विरुद्व वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत - शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, पूजा वस्त्रकर ,राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com