Team India News: टीम इंडियाचा वर्ल्डकपचा प्लान ठरला! रोहितचा मोठा खुलासा

Team India Squad For T20 World Cup: भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने मोठा खुलासा केला आहे.
team india
team indiasaam tv news

Team India T20 World Cup Plan:

भारतीय संघाच्या मिशन टी-वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ शेवटची टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेत भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली आहे. ही टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची शेवटची टी-२० मालिका होती. आता हे सर्व खेळाडू आयपीएल खेळताना दिसतील. दरम्यान भारतीय संघाची संघबांधणी झाली आहे का? यावर रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं आहे

भारतीय संघाने जिओ सिनेमावर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'आम्ही १५ खेळाडू तर नाही मात्र ८-१० खेळाडू डोक्यात आहेत. त्यामुळे आम्ही परिस्थितीनुसार संघाची निवड करु. वेस्टइंडिजमध्ये कंडिशन स्लो आहे त्यामुळे आम्ही संघाची निवड त्यानुसार करु.'

अफगाणिस्तानविरुद्ध ठोकलं खणखणीत शतक...

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबादी केली. त्याने अवघ्या ६९ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. भारतीय संघाचे अवघ्या २२ धावसंख्येवर ४ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर रोहितने रिंकू सिंगसोबत मिळून भागीदारी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाची धावसंख्या २१२ धावांवर जाऊन पोहोचली. (Latest sports updates)

team india
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

सलग २ सुपर ओव्हर अन् भारतीय संघाचा विजय..

या सामन्याचा निकाल २ सुपर ओव्हरनंतर लागला आहे. दोन्ही संघांनी २० षटकअखेर २१२-२१२ धावा केल्या. त्यानंतर दोन्ही संघ सुपर ओव्हरसाठी मैदानात आले. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या. हा सामना टाय झाल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानावर उतरले. भारतीय संघाने ११ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ १ धाव करता आली.

team india
Rohit Sharma Statement: 'आम्हाला त्याची गरज आहे..' शानदार विजयानंतर रोहितने या खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com