Team India Record: ICC स्पर्धेतील फायनल्समध्ये कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर

Team India Records In ICC Finals: भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान फायनलमध्ये कसा राहिलाय या संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
Team India Record: ICC स्पर्धेतील फायनल्समध्ये कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर
team indiatwitter
Published On

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची समान संधी आहे. भारतीय संघासाठी न्यूझीलंडला हरवणं सोपं मुळीच नसेल. दरम्यान आयसीसीच्या फायनलमध्ये खेळताना कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Team India Record: ICC स्पर्धेतील फायनल्समध्ये कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर
Ind Vs Aus Match Highlights : विराटची संयमी खेळी ते हार्दिकची हार्ड हिटिंग, ही आहेत भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

आयसीसीच्या फायनलमध्ये कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा आयसीसीच्या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडीजला पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडीजवर ४३ धावांनी विजय मिळवला होता.

Team India Record: ICC स्पर्धेतील फायनल्समध्ये कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर
IND vs AUS : इथेच सामना फिरला, अन्यथा भारताच्या हातून फायनल निसटली असती,VIDEO

चॅम्पियन्स ट्रॉफी २००० च्या फायनलमध्ये प्रवेश

भारताने १९८३ वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भारताला पु्न्हा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी १७ वर्ष वाट पाहावी लागली होती. २००० साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. यावेळी आव्हान श्रीलंकेचं होतं. त्यावेळी श्रीलंकेच्या संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू होते. मात्र हा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. २ दिवस पाऊस काही थांबलाच नाही. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं.

Team India Record: ICC स्पर्धेतील फायनल्समध्ये कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? वाचा सविस्तर
Ind vs Aus: वर्ल्डकप पराभवाची व्याजासह परतफेड! ऑस्ट्रेलियाला लोळवत भारताची फायनलमध्ये धडक

भारताने २००३ मध्ये पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला होता . सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताने २८ वर्षांनंतर गाठली फायनल

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केलं. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com