CSK vs PBKS: आला लेट, झाला शेठ! लास्ट ओव्हर अन् माहीचे २ जबराट षटकार, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना; पाहा VIDEO

Mahendra Singh Dhoni Last Over Six: शेवटच्या षटकात WE Want Dhoni च्या घोषणांनी स्टेडियम गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले, माहीनेही २ बॉल २ सिक्स मारत जणू चाहत्यांची इच्छाच पुर्ण केली....
MahendraSingh Dhoni
MahendraSingh DhoniSaamtv
Published On

Chennai Super Kings vs Punjab Kings: सध्या क्रिडा विश्वात इंडियन प्रिमियर लीगचा रणसंग्राम सुरू आहे. आयपीएल (IPL) २०२३च्या ४१व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर चेन्नईने पंजाबसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये डेरेन कॉनवेने धुंवाधार  नाबाद ९२ धावा केल्या.

मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकात आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) दोन उत्तुंग षटकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. धोनीने अवघ्या तीन चेंडूत १३ धावा चोपत संघाला २०० चा आकडा गाठून दिला. धोनीच्या या सुंदर षटकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MahendraSingh Dhoni
CSK VS PBKS LIVE Updates: डेवोन कॉन्व्हे पुन्हा एकदा गोलंदाजांवर बरसला! पंजाबला विजयासाठी २०१ धावांचे आव्हान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याचे बोलले जात आहे. या मौसमात धोनीला मिळणारी लोकप्रियता प्रचंड आहे. सर्वच मैदानांवर चेन्नईचे (Chennai Super Kings) चाहते लाडक्या माहीला मैदानावर पाहण्यासाठी तौबा गर्दी करत आहेत. अशेच चित्र आजच्या सामन्यातही पाहायला मिळाले.

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नईचे होम ग्राऊंड असलेल्या चेपॉक मैदानावरही अशीच धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. मात्र सामन्यात धोनी मैदानावर फलंदाजीसाठी येण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये WE Want Dhoni च्या घोषणा पाहायला मिळत होत्या.

MahendraSingh Dhoni
Mark Boucher Reply: आधी IPL,नंतर WTC फायनल; गावसकरांनी रोहितला दिलेल्या विश्रांतीच्या सल्ल्यावर मार्क बाऊचरचे सणसणीत प्रत्युत्तर

शेवटच्या षटकात माही मैदानावर...

सामन्यात शेवटच्या षटकात रविंद्र जडेजाची विकेट गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. मात्र त्याने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन शानदार उत्तुंग षटकार मारून चाहत्यांच्या मनातील इच्छा पुर्ण केली. धोनी आणि शेवटच्या चेंडूवर सिक्स हे समिकरण काही नवीन नाही. आणि पुन्हा एकदा चाहत्यांना धोनीचा जबरदस्त फिनिशिंग टच पाहायला मिळाला. ज्यामुळे चेन्नईला २०० धावांचा टप्पा गाठता आला..

पंजाबला कॉनवे वादळाचा फटका...

दरम्यान, या सामन्यात चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने जबरदस्त खेळी केली. त्याने सर्वाधिक नाबाद ९२ धावा चोपत पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर ऋतुराज गायकवाडने ३७ आणि शिवम दुबेने २८ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, सॅम करन, राहुल चहर आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com