IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामान्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या समन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २०० धावा केल्या आहेत. तर पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावांची गरज आहे.
चेन्नईने केल्या २०० धावा
नाणेफेक जिंकून फलंदाजीला येण्याचा निर्णय चेन्नईच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्व्हेने मिळून चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगली सूरूवात करून दिली. दोघांनी मिळून ८६ धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड ३७ धावांची खेळी करून माघारी परतला. तर डेवोन कॉन्व्हेने नाबाद ९२ धावांची खेळी केली तर आक्रमक फलंदाज शिवम दुबेने २८ धावांचे योगदान दिले. शेवटी फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीने सलग २ चेंडूंमध्ये २ षटकार मारत नाबाद १३ धावांची खेळी केली.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११ :
चेन्नई सुपर किंग्ज:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक ), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना
पंजाब किंग्ज :
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.