Suryakumar Yadav Prank: 'कसं काय वर्मा जी बरं हाय का..? ' फ्लाईटमध्ये गाढ झोपेत असलेल्या तिलक वर्माची सुर्याने घेतली फिरकी- VIDEO

Suryakumar Yadav Prank On Tilak Verma: सूर्यकुमार यादव मैदानाबाहेर मस्ती करून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून आला आहे.
suryakumar yadav and tilak verma
suryakumar yadav and tilak verma twitter

Mumbai Indians Tweet: मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला या हंगामाच्या सुरुवातीला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तो शून्यावर बाद होऊन माघारी जात होता. मात्र तो फॉर्ममध्ये येताच त्याने विरोधी संघातील गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली आहे.

मुंबईला क्वालिफायरमध्ये पोहचवण्यात त्याने मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान मैदानात असताना आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा सूर्यकुमार यादव मैदानाबाहेर मस्ती करून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून आला आहे.

suryakumar yadav and tilak verma
Akash Madhwal Success Story: इंजिनियर काहीही करू शकतो! B.Tech ची नोकरी सोडली अन् टेनिस क्रिकेटर बनला मुंबईचा वंडर बॉय

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सूर्यकुमार यादव तिलक वर्मासोबत मस्ती करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

सूर्यकुमार यादव एयर हॉस्टेसकडून लिंबू घेतो. त्यांनंतर तो तिलक वर्माकडे जातो. तिलक वर्मा गाढ झोपेत असतो. सूर्यकुमार यादव त्याच्याजवळ जातो आणि त्याला लिंबू चाखवतो. लिंबूची चव ओठाला लागताच त्याला जाग येते. उठल्यानंतर तो इथे तिथे पाहू लागतो.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

मुंबईचा जोरदार विजय..

बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली होती. तर सूर्यकुमार यादवने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनीसने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर काइल मेयर्सने १८ धावांचे योगदान दिले. आकाश मधवालच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात ८१ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com