WTC Final 2023 : सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? टीम इंडियात अजिंक्य रहाणेची एन्ट्री होणार!

Ajinkya Rahane Team India : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघात होणार आहे.
Ajinkya Rahane Team India
Ajinkya Rahane Team IndiaSaam TV

ICC WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघात होणार आहे. आयपीएल 2023 संपल्यानंतर ७ जूनला इंग्लंडच्या ओवल मैदानावर हा सामना होईल. या सामन्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. . (Latest Marathi News)

टीम इंडियाचा कसोटीतील माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याची संघामध्ये एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर आहे. मात्र, तो आता परत पुनरागमन करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ajinkya Rahane Team India
LSG vs RCB Highlights : स्टॉयनिस-पूरनने आरसीबीला धुतलं; शेवटच्या चेंडूवर लखनौचा थरारक विजय

त्यामागचे कारणंही तसंच आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नईकडून खेळताना अजिंक्य रहाणेने दमदार खेळी केली. मुंबईच्या घरच्या मैदानावर रहाणेने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने केवळ २७ चेंडूत ६३ धावांची तडाखेबाज खेळी केली.  (Breaking Marathi News)

अजिंक्य रहाणेने चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, या सामन्यात दमदार फॉर्म दाखवल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी रहाणेचे परतीचे मार्ग उघडले आहेत.

सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? अजिंक्य रहाणेला संधी?

अजिंक्य रहाणेने अखेरचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळला होता. जानेवारी २०२२ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात श्रेयस अय्यरने रहाणेची जागा घेतली.  (Latest sports updates)

Ajinkya Rahane Team India
Kaviya Maran Video : हट यार! भर मैदानात कॅमेरामनवर भडकली सनरायजर्स हैदाबादची मालकीन; VIDEO तुफान व्हायरल

अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनही अय्यर बाहेर पडला आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे अशात रहाणेला (Ajinkya Rahane) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

कसोटी पुनरागमनाबद्दल काय म्हणाला रहाणे?

दरम्यान, कसोटी संघात पुनरागमनाबाबत अजिंक्य रहाणेने सुद्धा प्रतिक्रिया दिली. “मला आता सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी एक मोठा प्रवास करायचा आहे. निवड समितीने (Team India) जर माझ्यावर विश्वास दाखवला तर तो मी साध्य ठरवेल. काहीही होऊ शकतं. मी हार मानणार नाही”, असं अजिंक्य रहाणेने म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com