

Happy Birthday Sunil Gavaskar: भारतीय संघाला अनेक दिग्गज फलदांज लाभले आहेत. ज्यात मोहम्मद अजहरुद्दीन, लाला अमरनाथ, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर सारख्या दिग्जज फलंदाजांचा समावेश आहे.
सुनील गावसकरांना भारतीय क्रिकेटमध्ये लिटिल मास्टर म्हणून ओळखलं जातं. हेल्मेट न घालता ५.५ फूट उंचीचा हा फलंदाज ७ फूट उंच असलेल्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायचा.
सुनील गावसकर आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी जाणून घ्या सुनील गावसकर यांच्या हटके लव्ह स्टोरीचा हटके किस्सा. (Sunil Gavaskar Love story)
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर मार्शलीन मल्होत्राच्या प्रेमात पडले होते. या दोघांची भेट ऑटोग्राफ घेत असताना झाली होती. मार्शलीन मल्होत्रा या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या आहेत.
ज्यावेळी सुनील गावसकर आणि मार्शलीन मल्होत्रा यांची भेट झाली होती, त्यावेळी त्या दिल्लीतील श्रीराम कॉलेजमध्ये आपलं BA चं शिक्षण पूर्ण करत होत्या. सामना सुरु असताना लंचब्रेकच्या वेळी सुनील गावसकर गॅलरीत आले होते. त्यावेळी मार्शलीन मल्होत्रा यांनी सुनील गावसकरांकडे ऑटोग्राफची मागणी केली होती.
माध्यमातील वृत्तानुसार, मार्शलीनला पाहताक्षणीच सुनील गावसकर प्रेमात पडले होते. मात्र मार्शलीनला याबाबत काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर सुनील गावसकरांनी स्वतः मार्शलीनच्या घरचा पत्ता शोधून काढला होता आणि घराभोवती फेऱ्या देखील मारल्या होत्या. (Latest sports updates)
कानपुरमध्ये घातली लग्नाची मागणी..
माध्यमातील वृत्तानुसार सुनील गावसकर यांनी कानपुरमध्ये जाऊन मार्शलीनला लग्नाची मागणी घातली होती. त्यांनी मार्शलीनला तिच्या घरच्यांसमोर लग्नासाठी विचारलं होतं. कानपुरमध्ये भारतीय संघाचा सामना होणार होता.
या सामन्यासाठी सुनील गावसकर यांनी मार्शलीन आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला सामना पाहण्यासाठी बोलावलं होतं.
हा सामना झाल्यानंतर त्यांनी मार्शलीनला लग्नासाठी मागणी घातली होती. मार्शलीन आणि तिच्या कुटुंबाने त्वरित लग्नासाठी होकार कळवला. दोघेही २३ सप्टेंबर १९७४ रोजी विवाह बंधनात अडकले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.