B Sai Praneeth Retirement: बी साई प्रणीतचा बॅडमिंटनला अलविदा! वयाच्या ३१ व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा

Badminton Player B Sai Praneeth Retirement News: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने रविवारी निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
Star Indian Badminton Player B Sai Praneeth Announced Retirement from Badminton
Star Indian Badminton Player B Sai Praneeth Announced Retirement from Badmintontwitter
Published On

B Sai Praneeth Retirement News In Marathi:

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने रविवारी निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने कांस्यपदकावर नाव कोरत इतिहास घडवला होता. यासह ३६ वर्षांनंतर भारतासाठी पदक जिंकणारा पहिलाच बॅडमिंटनपटू ठरला होता. बी साई प्रणीतपूर्वी १९८३ मध्ये प्रकाश पादुकोण यांनी हा कारनामा करुन दाखवला होता.

Star Indian Badminton Player B Sai Praneeth Announced Retirement from Badminton
IND vs ENG 5th Test: इंग्लंडविरुद्ध ३- १ ने आघाडीवर असूनही शेवटचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा का? हे आहे कारण

पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा..

हैदराबादच्या या स्टार खेळाडूने आपल्या कारकिर्दीचा शेवट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

प्रणीतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, २०१९ मध्ये त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती. याच वर्षी त्याचा अर्जून पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. २००३ मध्ये त्याने थायलंड ओपन ग्रां पी गोल्ड स्पर्धेतील पहिल्याच फेरीत मलेशियाच्या मुहम्मद हाफिजचा पराभव केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने तौफिक हिदायतला घरच्याच मैदानावर धूळ चारत नाव कमावलं.

प्रणीतने २०१० मध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतील सिंगल्समध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने बॅक टू बॅक २ पदकं पटकावली. भारतात आयोजित करण्यात आलेल्या एशियन गेम्स स्पर्धेतील सांघिक प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानंतर २०१९ मध्ये त्याने इतिहास घडवला. याच वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं होतं.

Star Indian Badminton Player B Sai Praneeth Announced Retirement from Badminton
IND vs ENG 5th Test, Weather Update: भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना रद्द होणार? चिंता वाढवणारं कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com