नवी दिल्ली : आगामी होणाऱ्या आशिया कप करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी टीम इंडिया आशिया कपमध्ये (Asia Cup) सहभागी होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शहा यांना पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिलं होतं.
पाकिस्तान 2023 चा भारतात होणारा वर्ल्डकप (world Cup) खेळणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली होती. पाकिस्तानच्या या धमकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील क्रेंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या धमकीला बीसीसीआय उत्तर देईल आणि वनडे वर्ल्डकप 2023 भारतातंच खेळवला जाईल.भारत मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे भारताला कुणाचं ऐकायची गरज नाही, अंस ठाकूर यांनी स्पष्ट केलं. (Sports minister Anurag Thakur gives reaction on Pakistan cricket board threat)
काय म्हणाले क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर?
2023 चा वनडे वर्ल्डकपचं यजमानपद भारत भूषवणार असून या स्पर्धेत पाकिस्तानची टीम सहभागी होणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टीपण्णी केली आहे. ठाकूर म्हणाले, बीसीसीआय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ब्लॅकमेल पत्राला उत्तर देईल. 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतातच होणार आहे. त्यांनी पुढं म्हटलं, हा बीसीसीआयचा विषय आहे आणि बोर्ड पाकिस्तानला उत्तर देईल. पुढच्या वर्षीही वर्ल्डकप होईल आणि जगभरातील संघ वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील. भारत मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे भारताला कुणाचं ऐकायची गरज नाही.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, आज भारताला कोणत्याच क्षेत्रात नाकारलं जावू शकत नाही. भारताचं क्रिकेट विश्वात खूप मोठं योगदान आहे. वर्ल्डकप भारतात होईल. जो भव्य आणि ऐतिहासिक असेल. गृह विभाग निर्णय घेईल. कारण पाकिस्तानमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा फक्त क्रिकेटचा विषय नाहीय. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दौरा केला, पण त्यांची तुलना भारतासोबत होऊ शकते का? असा सवालही अनुराग यांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.