IND vs SA 2nd T20I Highlights: रिंकू-सूर्याची अर्थशतकी खेळी व्यर्थ, दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा दणदणीत पराभव

IND vs SA 2nd T20I Highlights Update: सामन्यादरम्यान पाऊस पडल्याने डकवर्थ नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकात १५२ धावांचं आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून टीम इंडियाला धूळ चारली.
India vs south africa
India vs south africasaam tv
Published On

india vs South Africa 2nd t20i News:

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत टी-२० च्या तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियावर भारी पडला. सामन्यादरम्यान पाऊस पडल्याने डकवर्थ नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकात १५२ धावांचं आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून टीम इंडियाला धूळ चारली. (Latest Marathi News)

टीम इंडियाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केल्याने १९.३ षटकात १८० धावा केल्या. पावसामुळे पहिल्या डाव व्यवस्थित पूर्ण झाला नाही. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गकेबरहा मैदानावर १५ षटकात १५२ धावांचं आव्हान मिळालं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India vs south africa
India names squad for U19 CWC: आयसीसी २०२४ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडं संघाचं नेतृत्व

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आव्हानाचा पाठलाग करताना तुफानी सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या विकेटसाठी २.३ षटकातच ४२ धावांची खेळी खेळली. त्यानंतर ब्रीट्जके धावचीत झाला. ब्रीट्जकेनंतर हेंड्रिक्सनंतर कर्णधार मार्करामसोबत ५४ धावांची भागीदारी रचली. पुढे दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरू झाली. दक्षिण आफ्रिकेचे दोन गडी स्वस्तात बाद झाले.

मिलर आणि ट्रिस्टनच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेचा जिंकण्याचा मार्ग सुकर झाला. एंडिलेने षटकार लगावत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर विजय मिळवला. आजच्या सामन्यात टीम इंडियासाठी मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

India vs south africa
Turkey Referee Punched: फुटबॉलचं मैदान की WWFचं; लाइव्ह मॅचमध्ये संघ मालकाचा रेफ्रीला जोरदार 'पंच'

रिंकूंचं पहिलं अर्धशतक

टीम इंडियाची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल शून्य धावांवर बाद झाले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने ५६ तर तिलक वर्माने २९ धावा केल्या. पुढे सूर्या आणि रिंकूने चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली.

सूर्या बाद झाल्यावर रिंकूने रविद्र जडेजासोबत ३८ धावांची भागीदारी रचली. या सामन्यात रिंकू सिंहने पहिली अर्धशतकी खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जानसेन, लिजाद, शम्सी आणि मार्करामने एक एक गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com