Shubman Gill Catch: सुपरमॅन शुभमन गिल! बाऊंड्री लाईनवर टिपला भन्नाट झेल; VIDEO झाला व्हायरल

IND vs SL, 3rd ODI : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने शानदार झेट टिपला आहे.
Shubman Gill Catch: सुपरमॅन शुभमन गिल! बाऊंड्री लाईनवर टिपला भन्नाट झेल; VIDEO झाला व्हायरल
shubman gill catchtwitter
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकअखेर ७ गडी बाद २४८ धावा केल्या आहेत. दरम्यान पहिल्या डावातील ४९ व्या षटकात कुसल मेंडीसला बाद करण्यासाठी शुभमन गिलने शानदार झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गिलने टिपला शानदार झेल

शुभमन गिल हा भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना शानदार झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. तर झाले असे की, श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना भारतीय संघाकडून ४९ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या कुसल मेंडीसने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने मोठा फटका मारला, चेंडू बॅटला लागताच बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात होता. मात्र बाऊंड्री लाईनवर शुभमन गिलने भन्नाट झेल टिपला.

Shubman Gill Catch: सुपरमॅन शुभमन गिल! बाऊंड्री लाईनवर टिपला भन्नाट झेल; VIDEO झाला व्हायरल
IND vs SL : केएल राहुलचा पत्ता कट, ऋषभ पंतला संधी, निर्णायक सामन्यात रोहितनं डाव टाकला, पाहा प्लेईंग 11

भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४९ धावांची गरज

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पथुम निसंका आणि अविष्का फर्नांडोने मिळून ८९ धावा जोडल्या. निसंकाने ६५ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. तर फर्नांडोने १०२ चेंडूंचा सामना करत ९६ धावा जोडल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडीसने ८२ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची खेळी केली. शेवटी कमिंदू मेंडीसने १९ चेंडूत २३ धावा करत संघाची धावसंख्या ७ गडी बाद २४८ धावांवर पोहोचवली.

Shubman Gill Catch: सुपरमॅन शुभमन गिल! बाऊंड्री लाईनवर टिपला भन्नाट झेल; VIDEO झाला व्हायरल
Paris Olympics 2024: फक्त १०० ग्रॅम वजन जास्त, विनेश फोगाटला फायनलआधी अपात्र ठरवलं, ऑलिम्पिकचा नियम काय सांगतो....

भारतीय जोडी स्वस्तात माघारी

या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४९ धावा करायच्या होत्या. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र या सामन्यात या जोडीला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. शुभमन गिल १४ चेंडूत ६ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्मा २० चेंडूत ३५ धावांची खेळी करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com