
सध्या भारत विरूद्ध इंग्लड यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीये. दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिलने दमदार खेळी करत मैदानात इतिहास घडला. गिलने दुसऱ्या दिवसाच्या खेळात २६९ रन्सची जबरदस्त खेळी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात सर्वांना असं वाटत होतं की, सगळ्यांना वाटत असताना की गिल ट्रिपल सेंच्युरी म्हणजेच ३०० धावांचा टप्पा पार करेल. मात्र हा ऐतिहासिक क्षण ३१ रन्सने हुकला. वीरेंद्र सेहवाग आणि करुण नायरनंतर भारताला ट्रिपल सेंचुरी करणारा तिसरा फलंदाज मिळणार असं वाटत असतानाच गिलची खेळी संपली आणि चाहत्यांचा हिरमोड झाला.
भारताची अवस्था २ बाद ९५ अशी असताना शुभमन गिल मैदानात उतरला. त्या क्षणी टीम संकटात असताना गिलने एक बाजू लावून धरली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वी जैस्वालसोबत ६६, तर ऋषभ पंतसोबत ४७ रन्सची पार्टनरशिप करून गिलने डाव सावरण्याचं काम केलं.
यानंतर कॅप्टन गिलने रवींद्र जडेजासोबत उत्तम पार्टनरशिप केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी २०३ रन्स करत इंग्लंडच्या गोलंदाजांना भंडावून सोडलं . जडेजा बाद झाल्यावरही गिल थांबला नाही. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसोबत आणखी १४४ रन्सची पार्टनरशिप करत चांगला स्कोर केला.
गिलची बॅट जणू थांबायचं नावच घेत नव्हती. त्याने शतक पूर्ण केलं, मग द्विशतक, आणि त्यानंतर २५० चाही टप्पा पार केला. देशभरातील सर्व चाहते गिलच्या तिसऱ्या शतकाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, गिलने २६९ रन्सवर जोश टंगच्या एका बॉलवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, आणि बॉल थेट स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या ओली पोपच्या हातात गेला.
गिलने या खेळीद्वारे भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज असा रेकॉर्ड केला आहे. याआधी विराट कोहलीने पुणे कसोटीत २५४ रन्स केले होते. आता गिलने २६९ रन्स करत विराटचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडच्या भूमीवर भारताकडून सर्वात मोठी टेस्ट खेळी करणारा खेळाडू सुनील गावसकर होते. १९७९ मध्ये ओव्हल टेस्टमध्ये त्यांनी २२१ रन्स केले होते. आता गिलने तो विक्रमही पार केला आहे. याशिवाय शुभमन गिल हा इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान याने २००१ मध्ये लॉर्ड्सवर १९३ रन्सची सर्वोच्च खेळी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.