

सिडनी वनडेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती.
श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर असून तो आयसीयूमधून बाहेर आलाय.
दुखापतीनंतर श्रेयस अय्यरला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
सिडनी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आलीय. सिडनी वनडे दरम्यान श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना जखमी झाला होता.
झेल घेताना श्रेय्यस बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावला आणि कॅच घेतला. कॅच घेताना तो खाली पडला त्याचवेळी त्याच्या पोटच्या वरच्या बाजुला मार लागला. त्यानंतर त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आले. तेथे काहीवेळानंतर त्याला जास्त वेदना होऊ लागला. त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रेयसच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याला आयसीयुमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. श्रेयसला त्याच्या प्लीहाला दुखापत झाल्याची माहितीही अधिकाऱ्याने दिली. 'लेसरेशन' (laceration) दुखापत म्हणजे साधारण प्लीहाच्या ऊतीमध्ये कट किंवा ते फाटणे. अय्यरने जेव्हा कॅच घेतला त्यावेळी तो खाली पडला तेव्हा त्याला ही दुखापत झाली.
प्लीहा ही एक अशी ऊती आहे, जी रक्तवाहिन्यांमध्ये असते. त्यामुळे काही दुखापत झाली तर पोटाच्या पोकळीत लक्षणीय अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. जर एखाद्या मोठ्या रक्तवाहिनीला नुकसान झाले तर होणारा रक्तस्त्राव हा जीवघेणा ठरू शकतो. दरम्यान अय्यरवर शस्त्रक्रिया झाली आहे की नाही याबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये.
परंतु खेळांमध्ये, सौम्य दुखापती सहसा विश्रांती आणि निरीक्षणाने बऱ्या होत असतात. तर अधिक गंभीर प्रकरणांमध्ये अँजिओग्राफिक एम्बोलायझेशनची आवश्यकता असू शकते. ही शस्त्रक्रिया रक्तस्त्राव वाहिन्यांना सील करते. दरम्यान अय्यरच्या बाबतची अपडेट सार्वजनिक करण्यात आली नाहीये. परंतु अय्यर "उपचार घेत असून तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे. तो बरा होतोय, अशी माहिती बीसीसीआयनं दिलीय. दरम्यान भारतीय संघाचे डॉक्टर सिडनीमध्येच राहिलेत. ते श्रेयसच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करतील त्यासाठी ते त्याच्यासोबत राहतील, अशी माहिती बीसीसीआयने दिलीय.
अशी दुखापत झाल्यानंतर खेळाडूंना सहसा काही आठवडे किंवा महिने खेळापासून दूर ठेवले जाते. जेणेकरून त्यांना आणखी दुखापत किंवा पुन्हा दुखापत होणार नाही. जेव्हा शारिरिक चाचणी केली जाते, त्यात तो पूर्ण बरेा झालाय याची पुष्टी होते तेव्हाच त्यांना रुग्णालयातून सोडले जाते.
दुखापतीच्या ग्रेडवर सुधारणा अवलंबून असते. ग्रेड I-II च्या जखमांसाठी, साधारण सुधारण्याचा कालावधी हा 6-8 आठवडे असतो. ग्रेड III च्या जखमा भरून निघण्यासाठी सहसा 2-3 महिने लागता. तर ग्रेड IV च्या जखमांना - म्हणजेच ज्यांना शस्त्रक्रिया आवश्यक असते त्यांना ठणठणीत होण्यासाठी 3-6 महिने किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.