Shahid Afridi: पाकिस्तानात नाही आले ना.. आता भारताला दुबईत हरवा; शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला

Shahid Afridi On India vs Pakistan Match: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारत -पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
shaheed afridi
shaheed afridisaam tv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा संघ बलाढ्य न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने पाकिस्तान संघातील खेळाडूंना गुरुमंत्र दिला आहे.

त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह फिल्डिंगमध्येही चांगली कामगिरी करावी असा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न गेल्याने तो नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे.

shaheed afridi
Team India: IND vs ENG मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? Champions Trophy आधी किती प्रश्नांची उत्तरं मिळाली?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र ही घोषणा झाल्यापासूनच भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईत खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यामुळे शाहीद आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली आहे.

shaheed afridi
Ind Vs Pak : "भारताकडून हरलो तरी चालेल पण.." चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानचा खेळाडू काय म्हणाला? VIDEO

भारतीय संघाबाबत बोलताना शाहीद आफ्रिदी म्हणाला, ' भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही, त्यांना मी आता काय बोलू.. त्यांनी यायला हवं होतं. जगभरातील सर्व संघ पाकिस्तानात येणार आहेत, मग भारतीय संघानेही यायला हवं होतं. भारतीय संघ जिथे कुठे खेळत असेल, पाकिस्तानने त्यांना तिथे जाऊन हरवावं.. आता ही जबाबदारी पाकिस्तान संघातील खेळाडूंवर आहे.'

shaheed afridi
Champions Trophy 2025: 8 संघ, 19 दिवस, 15 सामने..आजपासून क्रिकेटच्या मिनी वर्ल्डकपला सुरुवात! पाहा संपूर्ण वेळापत्रक

पाकिस्तानच्या खेळाडूंना विजयासाठी गुरमंत्र

आफ्रिदी म्हणाला, 'चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं, तर मला असं वाटतंय की सर्वच संघांनी जोरदार सराव केला आहे. पाकिस्तानला जिंकायचं असेल, तर गोलंदाजी,फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन पाकिस्तान जिंकेल. भारत आहे, न्यूझीलंड आहे, बांगलादेश आहे..तिन्ही संघ मजबूत आहेत. माझी ईच्छा आहे, पाकिस्तानने फायनल खेळावं, पण त्यासाठी तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com