Shaheen Afridi 4 Wickets Video: W,W,W,W, वर्ल्ड कपपूर्वी आफ्रिदीचा कहर! पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या 4 Wickets; पाहा VIDEO

Shaheen Afridi 4 Wickets In 4 Balls : नॉटिंगहॅमशायर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात ४ विकेट्स घेतल्या आहेत.
shaheen afridi 4 wickets
shaheen afridi 4 wicketstwitter
Published On

T-20 Blast 2023: इंग्लंडमध्ये सध्या टी -२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने कहर केल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेत नॉटिंगहॅमशायर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात ४ विकेट्स घेतल्या आहेत.

यासह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. नॉटिंगहॅमशायर आणि वार्विकशायर यांच्यात झालेल्या लढतीत बाजी जरी वर्विकशायरने मारली असली तरी शाहीन आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली आहेत.

shaheen afridi 4 wickets
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

टी -२० ब्लास्टच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नॉटिंगहॅमशायर संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहीनने पहिला चेंडू वाईड टाकला, ज्यावर ४ धावा मिळाल्या.

पुढच्याच चेंडूवर त्याने ॲलेक्स डेव्हिडला अचूक यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडू कळायच्या आत त्याच्या पॅडला जाऊन धडकला आणि डेव्हिड पायचीत होऊन माघारी परतला.

पुढच्याच चेंडूवर शाहीनने बेंजामिनने क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर पुढच्या २ चेंडूंवर प्रत्येकी १-१ धाव आली. (Shaheen Afridi 4 Wickets)

मात्र पाचव्याच चेंडूवर शाहीनने डॅन मोसलेला बाद करत पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने एड बर्नार्डला आपला शिकार बनवलं आणि एकाच षटकात ४ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. (Latest sports updates)

शाहीन आफ्रिदीच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २९ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. या दरम्यान त्याने एक निर्धाव षटक देखील टाकले. यासह त्याने टी-२० क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये पहिले षटक टाकताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.

शाहीन आफ्रिदीचा संघ पराभूत..

या सामन्यात वर्विकशायर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत असलेल्या नॉटिंगहॅमशायर संघाने २० षटक अखेर १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वर्विकशायर संघाने १९.१ षटकात हे आव्हान पूर्ण करत, सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com