जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला आहे. मात्र सद्यपरिस्थिती पाहता इंग्लंडला सुपर ८ चं तिकीट मिळणंही कठीण झालं आहे. ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयासह स्कॉटलंडच्या नेट रनरेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ओमान विरुद्ध स्कॉटलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या ओमानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. ओमानकडून प्रतिक आठवलेने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. तर आयान खानने ४१ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर ओमानला २० षटकअखेर ७ गडी बाद १५० धावांपर्यंत मजल मारता आली.
स्कॉटलंडला हा सामना जिंकण्यासाठी १५१ धावांची गरज होती. हे आव्हान स्कॉटलंडने १३.१ षटक आणि ७ गडी राखून पूर्ण केलं. स्कॉटलंडकडून फलंदाजी करताना ब्रेंडन मॅक्मुलेनने ३१ चेंडूंचा सामनाक करत ६१ धावांची खेळी केली. तर जॉर्ज मुंसेने अवघ्या २० चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली.
या विजयासह स्कॉटलंडचा संघ ३ सामने जिंकून २.१६४ नेट रनरेटसह ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर २ पैकी २ सामने जिंकलेला ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर नामिबिया आणि इंग्लंड यांचा नेट रनरेट मायनसमध्ये आहे.
इंग्लंडचा १ सामना हा पावसामुळे धुतला गेला आहे. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचे पुढील दोन सामने नामिबिया आणि ओमानविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकूनही इंग्लंडला सुपर ८ चं तिकीट मिळणं कठीण आहे. कारण हे दोन्ही सामने जिंकून इंग्लंडचा संघ ५ गुणांपर्यंत पोहचू शकतो. हे गुण सुपर ८ साठी पुरेशे नसतील. त्यामुळे भारतीय संघाला हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासह इंग्लंडला ऑस्ट्रेलियावरही अवलंबून राहावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.