Sarfaraz Khan new look: हो खरंच...! सरफराज खानने 2 महिन्यात घटवलं 17 किलो वजन; लूक पाहून अनेकांना विश्वासच बसेना

Sarfaraz Khan weight loss: युवा फलंदाज सरफराज खान सध्या त्याच्या खेळीपेक्षा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. सरफराजने अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १७ किलो वजन कमी केले असून, त्याचा नवा आणि फिट लूक पाहून क्रिकेट चाहते चकित झाले आहेत.
Sarfaraz Khan weight loss
Sarfaraz Khan weight losssaam tv
Published On

क्रिकेटर सरफराज खान भारतीय क्रिकेट टीमतून बराच काळ बाहेर आहे. मात्र आता सरफराज खान चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या बॅटिंगमुळे नव्हे तर त्याने आपल्या फिटनेसमध्ये केलेल्या अफाट मेहनतीमुळे तो चर्चेत आहे. सरफराजकडे कौशल्याची कमतरता नाही पण निवड समितीचा विश्वास मिळवण्यासाठी केवळ खेळ पुरेसा नाही, तर उत्तम फिटनेसही आवश्यक असतो. याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत त्याने स्वतःमध्य मोठा बदल केला.

सरफराज खानला काही महिन्यांपूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत 'अ' टीममध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. त्या एकमेव सामन्यात त्याने ९२ रन्सची दमदार खेळी केली. एवढं करूनही त्याला भारतीय वरिष्ठ टीममध्ये स्थान मिळालं नाही आणि हेच त्याच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

Sarfaraz Khan weight loss
Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

दोन महिन्यात घटवलं १७ किलो वजन

भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी खेळासोबतच फिटनेसलाही तितकंच महत्त्व दिलं जातं. हे लक्षात घेऊन सरफराजने स्वतःवर जबरदस्त मेहनत सुरू केली. त्याने नियमित व्यायाम, योग्य डाएट आणि काटेकोर डेली रूटीममध्ये स्वतःला झोकून दिलं. त्याचा परिणाम असा की, अवघ्या दोन महिन्यांत त्याने तब्बल १७ किलो वजन घटवलं आहे. सोमवारी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सरफराज जिममध्ये उभा असलेला दिसतोय आणि त्याच्या ट्रान्सफॉर्म रूपात तो एकदम फिट दिसतोय. त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून स्पष्ट सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहे.

Sarfaraz Khan weight loss
Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीपूर्वी मोहम्मद सिराजने दिली गुडन्यूज, म्हणाला...

केविन पीटरसनने देखील केलं कौतुक

सरफराजचं हे ट्रान्सफॉर्मेशन केवळ चाहत्यांनाच नव्हे तर क्रिकेटमधील दिग्गजांनाही प्रभावीत करून गेलं आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने सरफराजच्या मेहनतीची मनापासून प्रशंसा केली आहे.

त्याने लिहिलंय, “खूपच जबरदस्त प्रयत्न, युवा खेळाडू. तुला मनःपूर्वक शुभेच्छा. माझ्या मते, यामुळे तू खूप पुढे जाशील आणि मैदानावर तुझी कामगिरी आणखी चांगली होईल. मला हे पाहून आनंद झाला की तू तुझ्या प्रायोरिटीजवर लक्ष केंद्रीत केलंस. कोणी तरी ही पोस्ट पृथ्वी शॉलाही दाखवावी!”

Sarfaraz Khan weight loss
Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

सरफराज खानच्या या मेहनतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, फक्त टॅलेंट असून भागत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने स्थान टिकवण्यासाठी फिटनेस ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. त्याचा हा बदल प्रेरणादायी आहे आणि अनेक तरुण खेळाडूंना आपल्या शरीर आणि खेळावर लक्ष देण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com