Sachin Tendulkar Records: सचिन तेंडुलकरचे टॉप ५ रेकॉर्ड, जे मोडणं कठीण नव्हे तर अशक्यच

Sachin Tendulkar Birhtday Special: भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा आज (२ एप्रिल) आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय. दरम्यान जाणून घ्या असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कठीण नव्हे तर अशक्य आहे.
sachin tendulkar birthday special know his 5 unbreakble records amd2000
sachin tendulkar birthday special know his 5 unbreakble records amd2000twitter

भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा आज (२ एप्रिल) आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय. सचिन तेंडुलकरच्या नावे आतापर्यंत अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. यापैकी सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड. आजवर कुठल्याच फलंदाजाला हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही. दरम्यान सचिनच्या नावे आणखी काही मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. जे मोडणं कठीण आहे.

सर्वाधिक कसोटी सामने..

सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० कसोटी सामने खेळण्याची नोंद आहे. उर्वरित खेळाडूंना इतके सामने खेळता आलेले नाहीत. वर्तमान क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने खेळणं ही मोठी गोष्ट मानली जाते. त्यामुळे सचिनचा हा रेकॉर्ड मोडणं कठीणच आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याची नोंद ही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत एकूण ६६४ सामने खेळले आहेत. दरम्यान ५०० सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.

sachin tendulkar birthday special know his 5 unbreakble records amd2000
IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आतापर्यंत ३४,३५७ धावा केल्या आहेत. वर्तमान क्रिकेटमध्ये फलंदाजांनी २५,००० धावांचा पल्ला गाठणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडणं देखील कठीण आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार..

सचिन तेंडुलकर हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. त्याने ६६४ सामन्यातील ८७२ डावात ४०७६ हून अधिक चौकार मारले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराने ३०१५ चौकार मारले आहेत.

sachin tendulkar birthday special know his 5 unbreakble records amd2000
Yuzvendra Chahal: फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच

सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन अव्वल स्थानी आहे. त्याने २६४ वेळेस हा कारनामा करून दाखवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com