Shubman Gill: अंपायर कन्फ्युज, गिल भडकला! १७ व्या षटकात नेमकं काय घडलं?

RR vs GT, IPL 2024: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९६ धावा केल्या.
rr vs gt match gujarat titans captain shubman gill got angry on umpire for not given wide
rr vs gt match gujarat titans captain shubman gill got angry on umpire for not given wide twitter

Shubman Gill On Wide Ball Controversy:

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९६ धावा केल्या. ही धावसंख्या गाठून देण्यात संजू सॅमसन आणि रियान परागने बहुमूल्य योगदान दिले. दरम्यान सामन्यातील पहिल्या डावातील १७ व्या षटकात असं काही घडलं ज्यामुळे कर्णधार शुभमन गिल थेट अंपायरशी वाद घालताना दिसून आला

तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाकडून १७ वे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील शेवटचा चेंडू स्लो टाकला. ज्यावर ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन फलंदाजी करत असलेल्या संजू सॅमसनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू वाई़ड लाईनच्या अगदी जवळून गेला. अंपायरने हा चेंडू वाईड चेंडू घोषित केला. मात्र यष्टिरक्षक मॅथ्यु वेडला माहित होतं की, हा चेंडू वाईड नव्हता. कारण संजू सॅमसनने ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गिलने DRS ची मागणी केली

rr vs gt match gujarat titans captain shubman gill got angry on umpire for not given wide
RR vs GT, IPL 2024: सॅमसन -परागचा गुजरातवर हल्ला बोल! विजयासाठी ठेवलं १९७ धावांचं आव्हान

ज्यावेळी DRS घेण्यात आला त्यावेळी चेंडू बरोबर आहे. असं दिसून आलं. मात्र काही क्षणातच अंपायरने आपला निर्णय बदलला आणि वाईड चेंडू घोषित केला. त्यानंतर पुन्हा एकदा DRS घेण्यात आला आणि अंपायरने हा चेंडू वाईड घोषित केला. आधी वाईड न दिलेला चेंडू नंतर अचानक वाईड कसा काय दिला हे पाहून गिल भडकला. गिलने अंपायरजवळ जाऊन चर्चा देखील केली. शेवटी हा चेंडू वाईड चेंडू घोषित केला गेला. (Cricket news in marathi)

rr vs gt match gujarat titans captain shubman gill got angry on umpire for not given wide
Sanju Samson Statement: राजस्थानने सामना कुठे गमावला? कर्णधार संजू सॅमसनने सांगितला टर्निंग पॉईंट

गुजरातचा विजय..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय १९घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकअखेर १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने १९९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com