Rohit Sharma Record: आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

Rohit Sharma, Most Matches in T20 World Cup : टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा थरार १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे.
rohit sharma will become the only indian to play 9 t20 world cup tournament amd2000
rohit sharma will become the only indian to play 9 t20 world cup tournament amd2000twitter

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा थरार १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप हे या स्पर्धेचे नववे हंगाम असणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये रोहितला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. रोहित २००७ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या स्पर्धेत त्याने विजेता संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर तो टी-२० वर्ल्डकप २००९, टी-२० वर्ल्डकप २०१०, टी-२० वर्ल्डकप २०१२, टी-२० वर्ल्डकप २०१४, टी-२० वर्ल्डकप २०२१ आणि टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आतापर्यंत त्याने ८ हंगामांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

rohit sharma will become the only indian to play 9 t20 world cup tournament amd2000
MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

भारताचा कर्णधार म्हणून निवड..

गेल्या काही दिवसांपू्र्वी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवण्यात आलं होतं. तर हार्दिक पंड्याची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी होणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर ९ जून रोजी भारत पाकिस्तान सामन्याचा थरार न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे .

rohit sharma will become the only indian to play 9 t20 world cup tournament amd2000
MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com