Rohit Sharma Wicket Controversy: रोहीत शर्मा आऊट की नॉट आऊट? काय सांगतो एलबीडब्ल्युचा नियम?

Rohit Sharma LBW Wicket: रोहीतच्या विकेटने आता नवा वाद पेटला आहे.
ROHIT SHARMA WICKET
ROHIT SHARMA WICKETtwitter

MI Vs RCB, IPL 2023: वानखेडेच्या मैदानावर मुबंई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहाचला मिळाली. या लढतीत मुबंई इंडियन्स संघाने बाजी मारली आणि ६ गडी राखुन जोरदार विजय मिळवला.

या विजयानंतर मुबंईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान या सामन्यातही कर्णधार रोहीत शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. मात्र तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे.

ROHIT SHARMA WICKET
Suryakumar Yadav: एकच वादा सूर्या दादा.. मिस्टर 360 च्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

रोहीत शर्माला रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाविरूध्द झालेल्या सामन्यात एलबीडब्ल्यु बाद घोषित करण्यात आले होते. रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघातील गोलंदाज वनिंदु हसरंगाने त्याला पायचित करत माघारी धाडले. दरम्यान या विकेटनंतर आता नवा वाद पेटला आहे.

ज्यावेळी वनिंदु हसरंगाचा चेंडु रोहीत शर्माच्या पॅडला जाऊन लागला त्यावेळी रोहीत शर्मा हा क्रिझच्या बाहेर होता.

अशात पंचांनी त्याला बाद घोषित केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्विट करत लिहीले की, 'हॅलो डिआरएस हे जरा जास्त नाही झालं का ? हा एलबीडब्ल्यु कसा असू शकतो?' कैफ सह माजी भारतीय क्रिकेटपटू मुनाफ पटेलने देखील ट्विट करत लिहीले की, 'आता असं वाटतं की डिआरएसला पण डिआरएसची गरज आहे. अनलकी रोहीत शर्मा' (Latest sports updates)

रोहीतच्या विकेटवर वाद का पेटला आहे?

तर झाले असे की, रोहीत शर्मा फलंदाजी करत असताना रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाकडून वनिंदु हसरंगा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात रोहीत शर्माने स्टेप आऊट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेडूं त्याच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाने जोरदार मागणी केली. पंचांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यावेळी रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाने डिआरएसची मागणी केली. डिआरएस पाहुण पंचांनी त्याला बाद घोषित केले.

ROHIT SHARMA WICKET
GT VS LSG Weather Report: आज IPL स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादांच घडणार असं काही, मात्र पाऊस घालणार खोळंबा?

काय सांगतो एलबीडब्ल्युचा नियम?

एलबीडब्ल्युच्या नियमानुसार जर फलंदाज ३ मिटर किंवा त्यापेक्षा दुर असेल तर तो बाद घोषित केला जाऊ शकत नाही. जर तुम्ही रोहीतच्या विकेटचा व्हिडीओ पाहीला तर रोहीत शर्मा खुप पुढे उभे असल्याचे दिसुण येत आहे.

पंचांच असं म्हणणं आहे की, हा चेंडु स्टंपला जाऊन लागला असता. अनेक दिग्गजांचं असं देखील म्हणणं आहे की डिआरएसमध्येच काहीतरी गडबड आहे. मात्र हा सामना झाला आहे आणि मुंबईने हा सामना जिंकला आहे.

त्यामुळे मुबईला या गोष्टीचा जास्त फरक जाणवला नाही. मात्र मुंबईने जर हा सामना गमावला असता तर नक्कीच या विकेटचा वाद आणखी चिघळला असता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com