ICC Test Rankings: ICC च्या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या ओपनर्सचा बोलबाला! रोहितची टॉप 10 मध्ये धडक तर जयस्वालची 'यशस्वी' झेप

ICC Mens Test Rankings: आयसीसीने फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय फलंदाजांना फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
rohit sharm with yashasvi jaiswal
rohit sharm with yashasvi jaiswal saam tv
Published On: 

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदादच्या क्वीन्स पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय फलंदाजांना फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (ICC Test Rankings)

rohit sharm with yashasvi jaiswal
Team India Playing 11: आता विंडीजचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात धाकड खेळाडूची एंट्री; पाहा प्लेइंग 11

भारतीय सलामीवीर फलंदाजांची बाजी..

आयसीसीने नुकताच जाहीर केलेल्या यादीत भारतीय सलामीवीर फलंदाजांची चांदी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. टॉप १० मधून बाहेर पडलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा एकदा टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. त्याने वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १०३ धावांची खेळी केली होती. तर युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) पहिल्याच सामन्यात १७१ धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीचा फायदा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये देखील झाला आहे.

रोहितची टॉप १० मध्ये धडक..

रोहित शर्माने वेस्टइंडीजविरुद्ध शतक झळकावलं होतं. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने ७५१ रेटिंग पॉईंटससह दहावं स्थान गाठलं आहे. तर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वीचा देखील मोठा फायदा झाला आहे. तो ४२० रेटिंग पॉईंटससह ७३ व्या स्थानी पोहोचला आहे. तर टॉप १० मध्ये असलेला रिषभ पंत ७५० रेटिंग पॉईंट्ससह ११ व्या स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)

rohit sharm with yashasvi jaiswal
Asian Games 2023: 'तिला डायरेक्ट एंट्री मग आम्हाला ट्रायल्स का?' Vinesh Phogat चं नाव जाहीर होताच अंतिम पंघालने उपस्थित केला प्रश्न

केन विलियमसन अव्वल स्थानी.. .

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन ८८३ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. तर ८७४ रेटिंग पॉईंट्ससह ट्रेविस हेड दुसऱ्या स्थानी, ८६२ रेटिंग पॉईंट्ससह बाबर आजम तिसऱ्या स्थानी, ८५५ रेटिंग पॉइंट्ससह स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानी आणि मार्नस लाबुशेन ८४९ रेटिंग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी कायम आहे. तर विराट कोहली ७१४ रेटिंग पॉईंट्ससह १४ व्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.