Rohit Sharma: अरे ट्रॉफी तर घेऊन जा..आता तर रोहितने हद्दच पार केली; VIDEO पाहून हसून हसून पोट दुखेल

Rohit Sharma Forgets Trophy Viral Video: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं. दरम्यान या पराभवानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
Rohit Sharma: अरे ट्रॉफी तर घेऊन जा..आता तर रोहितने हद्दच पार केली; VIDEO पाहून हसून हसून पोट दुखेल
rohit sharmatwitter
Published On

संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाची. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्यांदा हा कारनामा करून दाखवला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान रोहित शर्माने पत्रकार परिषदेत असं काही केलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

Rohit Sharma: अरे ट्रॉफी तर घेऊन जा..आता तर रोहितने हद्दच पार केली; VIDEO पाहून हसून हसून पोट दुखेल
Rohit Sharma Record: टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या हिटमॅनने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेलला सोडलं मागे

रोहित शर्मा गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याची वेगळी ओळख सांगायची झाली, तर तो अनेकदा गोष्टी विसरतो. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात तो कधी मोबाईल तर कधी पासपोर्ट विसरला आहे. मात्र यावेळी तो चक्क आयसीसीची ट्रॉफी विसरला आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Rohit Sharma: अरे ट्रॉफी तर घेऊन जा..आता तर रोहितने हद्दच पार केली; VIDEO पाहून हसून हसून पोट दुखेल
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

तर झाले असे की, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर, खेळाडू जोरदार जल्लोष करत होते. त्यावेळी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. रोहितने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा तो ट्रॉफी तिकडेच विसरून पुढे जायला निघाला. त्यानंतर त्याला सांगावं लागलं की, ट्रॉफी तरी घेऊन जा..’ या मजेशीर व्हिडिओवर नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

भारताचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या हाय व्होल्टेज सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना २५१ धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून डॅरील मिचेलने ६४ तर मायकल ब्रेसवेलने ५३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने शानदार ७६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com