

आशिया चषक स्पर्धेला येत्या ३० ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आपला पहिला सामना २ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.
या स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या नावे एक मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
रोहित शर्मा सचिन तेंडुलकरला मागे सोडून आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या स्पर्धेतील २३ सामन्यांमध्ये ९७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.
या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २२ सामन्यांमध्ये आतापर्यंत ७४५ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिनला मागे सोडण्यासाठी त्याला केवळ २२६ धावांची गरज आहे. हिटमॅनने आतापर्यंत या स्पर्धेत ६ शतके झळकावली आहेत.
या फलंदाजाच्या नावे आहे सर्वाधिक धावा करण्याची नोंद..
आशिया चषकात सर्वाधिक धावा कऱण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसू्र्याच्या नावे आहे. त्याने २५ सामन्यांमध्ये १२२० धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने ६ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानी माजी फलंदाज कुमार संगकारा आहे.
त्याने या स्पर्धेतील २४ सामन्यांमध्ये १०७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतके आणि ८ अर्धशतचके झळकावली आहेत. तर सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक या यादीत चौथ्या स्थानी आहे. शोएब मलिकच्या नावे ७८६ धावा करण्याची नोंद आहे. (Latest sports updates)
आशिया चषक स्पर्धेला येत्या ३० ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
तर भारतीय संघाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघासोबत रंगणार आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद असले तरीदेखील भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.