Rohit Sharma Viral Video: हिटमॅनची शानागिरी! ब्रेक डान्स करुन कोणाला स्टेजवर येण्याचा इशारा केला? पाहा VIDEO

Rohit Sharma Shreyas Iyer Viral Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात तो डान्स करताना दिसून येत आहे.
Rohit Sharma Viral Video: हिटमॅनची शानागिरी! ब्रेक डान्स करुन कोणाला स्टेजवर येण्याचा इशारा केला? पाहा VIDEO
rohit sharmainstagram
Published On

वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास क्षणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. रविवारी या जल्लोषाचा शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाला मुंबईच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली.

ज्यात रोहित शर्मा, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. या सेलिब्रेशनदरम्यान खेळाडूंनी मस्ती देखील केली. दरम्यान श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी रोहित शर्मा खास डांस मुव्ह्ज करताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Rohit sharma dance)

Rohit Sharma Viral Video: हिटमॅनची शानागिरी! ब्रेक डान्स करुन कोणाला स्टेजवर येण्याचा इशारा केला? पाहा VIDEO
Rohit Sharma: मी प्रयत्न करेन, 140 कोटी लोकांच्या अपेक्षा...; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने चाहत्यांना दिलं वचन

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार्यक्रम सुरु असताना रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर रवी शास्त्री आणि सुनील गावसकरसारखे दिग्गज खेळाडू स्टेजवर उपस्थित होते. त्यावेळी ओम शांती ओम गाणं गायलं जात होतं.

Rohit Sharma Viral Video: हिटमॅनची शानागिरी! ब्रेक डान्स करुन कोणाला स्टेजवर येण्याचा इशारा केला? पाहा VIDEO
Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान

सर्व दिग्गज खेळाडू थिरकताना दिसून आले. तर रोहितने ब्रेक डान्स करुन श्रेयसकडे पाहिलं आणि त्याला स्टेजवर येऊन डान्स करण्याचा इशारा केला. हे पाहून श्रेयस अय्यरला ही हसू अनावर झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्सने या व्हिडिओला शानागिरी असं कॅप्शन दिलं आहे.

याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे एकत्र बसलेले दिसून येत आहेत. त्यावेळी एक चिमुकला फॅन छोटी बॅट घेऊन ऑटोग्राफ घेण्यासाठी येतो. रोहित त्याला नाराज करत नाही, त्याला ऑटोग्राफ देऊन त्यालाही खूश करतो. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Rohit Sharma Viral Video: हिटमॅनची शानागिरी! ब्रेक डान्स करुन कोणाला स्टेजवर येण्याचा इशारा केला? पाहा VIDEO
Rohit Sharma Leaked Video : "मला सेक्रेटरीसोबत बसावं लागणार.." रोहित शर्मा-अजित आगरकर यांच्यातील संभाषण लीक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com