आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी ३० एप्रिल रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय संघाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही?अशी चर्चा सुरु होती. मात्र त्याला संघात स्थानही दिलं गेलं आणि उपकर्णधारपद म्हणून निवडही करण्यात आली आहे. आता दैनिक जागरणच्या एका वृत्तात, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना हार्दिक पंड्या संघात नको होता.
या वृत्तात पुढे म्हटलं गेलं आहे की, हार्दिक पंड्याला संघात घेण्याचा दबाव आल्याने त्याला संघात स्थान द्यावं लागलं आहे. यासह टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर रोहित शर्मा टी-२० क्रिकेटला रामराम करणार असल्याचा देखील खुलासा करण्यात आला आहे.
हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत खेळलेल्या १३ पैकी केवळ ४ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १३ सामन्यांमध्ये १८.१८ च्या सरासरीने आणि १४४.९३ च्या स्ट्राईक रेटने २०० धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याला शतक किंवा अर्धशतक झळकावता आलेलं नाही. तर गोलंदाजी करताना त्याला १३ सामन्यांमध्ये ११ गडी बाद करता आले आहेत. यादरम्यान ३१ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
तर रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १३ सामन्यांमध्ये २९.०८ च्या सरासरीने आणि १४५.४२ च्या स्ट्राईक रेटने ३४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या शतक झळकावलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.