येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा राहुल द्रविड यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहीरात काढणार आहे.
यावरुन स्पष्ट होतंय की, बीसीसीआय राहुल द्रविडसोबत असलेला करार वाढवण्याच्या विचार करत नाहीये. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे की, राहुल द्रविड यांना या पदावर यायचं असेल तर त्यांना अर्ज करावा लागेल. तसेच नवा मुख्य प्रशिक्षक परदेशीही असू शकतो, असं जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
क्रिकबझवर बोलताना जय शाह म्हणाले की, ' राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जून महिन्यात समाप्त होणार आहे. जर त्यांना पुन्हा एकदा अर्ज करायचा असेल तर ते करु शकतात. पुढील मुख्य प्रशिक्षक भारतीय असणार की परदेशी हे आम्ही सांगु शकत नाही. हे सीएसी ठरवणार, आम्ही ग्लोबल बॉडी आहोत.' काही संघांमध्ये तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार आहेत. मात्र जय शाहच्या वक्तव्यानंतर आता स्पष्ट झालं आहे की, बीसीसीआय सध्यातरी ३ फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या मुख्यप्रशिक्षकांचा विचार करत नाहीये.'
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या मुख्यप्रशिक्षकांची निवड केली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे की, याबाबतचा निर्णय सीएसी घेणार. राहुल द्रविडनंतर नियुक्त केल्या जाणाऱ्या मुख्य प्रशिक्षकांचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.