IPL Points Table: मुंबई अन् पंजाब स्पर्धेतून बाहेर! सर्वात शेवटी असून गुजरात स्पर्धेत कायम; जाणून घ्या कसं काय?

IPL Points Table 2024: मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. तर आरसीबीच्या विजयानंतर पंजाबचा संघही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
punjab kings and mumbai indian out of ipl 2024 know why gujarat titans still in playoffs race amd2000
punjab kings and mumbai indian out of ipl 2024 know why gujarat titans still in playoffs race amd2000google

मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. तर आरसीबीच्या विजयानंतर पंजाबचा संघही स्पर्घतून बाहेर पडला आहे. हे दोन्ही संघ आयपीएलच्या गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानी आहे. मात्र दहाव्या स्थानी असलेला गुजरात टायटन्सचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कसा ? जाणून घ्या यामागचं कारण.

गुणतालिकेत तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांचे गुण प्रत्येकी ८-८ इतके आहेत. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने १२ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर ८ सामने गमावले आहेत. ८ गुणांसह मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. तर नेट रनरेटमध्ये पिछाडीवर असलेला पंजाबचा संघ नवव्या स्थानी आहे. ८ गुणांवर हे दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र ८ गुण असूनही गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये टिकून आहे.

punjab kings and mumbai indian out of ipl 2024 know why gujarat titans still in playoffs race amd2000
IPL 2024, Points Table: लखनऊच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला दणका! बनला स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ

गुजरातचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कसा?

शुभमग गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ८ गुणासंह १० व्या स्थानी असूनही गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे.

punjab kings and mumbai indian out of ipl 2024 know why gujarat titans still in playoffs race amd2000
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

कारण मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांचे १२ सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरीदेखील हे दोन्ही संघ १४ गुणांपर्यंत पोहचणार नाहीत. तर गुजरातचे इथून पुढे ३ सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जिंकले, तर गुजरातचा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. मात्र गुजरातला प्लेऑफचं तिकीट मिळणं कठीण आहे. कारण गुजरातचा नेट रनरेट कमी आहे आणि इतर संघ १४ गुणांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com