T20 WC 2024: कोहलीसाठी रोहितचा निवडकर्त्यांशी पंगा? संघ निवडकर्त्यांना 'रन मशीन' विराट का नको?

Virat Kohli : विराट कोहलीसाठी रोहित शर्मांने संघ निवडकर्त्यांशी पंगा घेतल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
T20 WC 2024: कोहलीसाठी रोहितचा निवडकर्त्यांशी पंगा? संघ निवडकर्त्यांना 'रन मशीन' विराट का नको?
Published On

Rohit Sharma Fought with Selectors for Virat Kohli:

टी २० वर्ल्ड कप २०२४ चं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वर्ल्ड कप जाहीर होताच भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंची रस्सीखेच सुरू झालीय. याचदरम्यान रोहित शर्माने विराट कोहलीसाठी निवडकर्त्यांशी पंगा घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघ निवडकर्ते रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांच्यापैकी एकाचीच निवड करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Latest News)

दरम्यान टी२० वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोहलीची संथ खेळी मंडळाच्या जिव्हारी लागली असून त्याच्या त्या खेळीमुळे संघ निवडकर्ते त्याला संघातून डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. विराट कोहलीऐवजी संघ निवडकर्ते इशान किशन किंवा यशस्वी जयस्वालला घेण्यास प्राधान्य देतील, असं म्हटलं जात आहे. दरम्यान टी२० वर्ल्ड कपच्याआधी आयपीएल होणार आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने धडकेबाज फलंदाजी केली तर विराटची वर्ल्डकपसाठी वर्णी लागू शकते.

सोशल मीडियावर चालू असलेल्या चर्चांनुसार, रोहित शर्मा आगामी टी२० वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीचा संघात समावेश असावा. यासाठी रोहित आग्रही आहे, तर संघ निवडकर्ते मात्र त्याला विरोध करत आहेत. संघ निवडकर्त्यांना विराटी संथ खेळी आवडत नाहीये. परंतु विराटसाठी रोहितने संघ निवडकर्त्यांशी पंगा घेतल्याचं म्हटलं जात आहे. ही पोस्ट एक्स या सोशल मीडियासाईटवर हायड्रोजन नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलीय.

T20 WC 2024: कोहलीसाठी रोहितचा निवडकर्त्यांशी पंगा? संघ निवडकर्त्यांना 'रन मशीन' विराट का नको?
Shweta Sehrawat ने बनला विक्रम; द्विशतक झळकावणारी बनली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com