Robin Uthappa : टीम इंडियाच्या घोषणेनंतर रॉबिन उथप्पाची नाराजी? घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रॉबिन उथप्पाने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नाही तर क्लब क्रिकेटलाही अलविदा केले आहे.
Robin Uthappa
Robin UthappaSaam Tv
Published On

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा (BCCI) दिग्गज फलंदाज रॉबिन उथप्पाने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नाही तर क्लब क्रिकेटलाही अलविदा केले आहे. ICC T20 विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा तो सदस्य राहिला आहे. रॉबिन उथप्पाने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून रॉबिन उथप्पा नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

बुधवार, १४ सप्टेंबर २०२२ रोजी उथप्पाने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. यावेळी त्याने बीसीसीआय आणि कर्नाटक क्रिकेट बोर्डचे आभार मानले आहे. देशासाठी आणि कर्नाटक राज्यासाठी खेळण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. सर्व चांगल्या गोष्टींना एक ना एक दिवस थांबायचे असल्याने, मोठ्या मनाने मी सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो, असं त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Robin Uthappa
Virat Kohli Income : विराट कोहली एका पोस्टमधून किती पैसे कमावतो माहीत आहे? जाणून घ्या डीटेल्स

उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ६ अर्धशतकांच्या बळावर एकदिवसीय सामन्यात ९३४ धावा केल्या. तर T20 मध्ये त्याने १ अर्धशतकासह २४९ धावा केल्या होत्या.

Robin Uthappa
Sourav Ganguly : सौरव गांगुली, जय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com